शाहिद कपूर, रश्मिका मंदाना आणि कृती सनॉन अभिनित ‘कॉकटेल 2’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने रिलीज पुर्वीपासुनच चर्चेत राहीला आहे. आणि आता रिलीज नंतर अवघ्या चार दिवसांत या चित्रपटाने 85 कोटी रुपयांची कमाई केली असून, तो लवकरच 100 कोटींच्या क्लब’मध्ये सामील होण्याच्या मार्गावर आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर कॉकटेल 2’ने भारतात 64 कोटी रुपये कमावले आहेत, तर त्याचे जागतिक स्तरावरील एकूण संकलन 85 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
‘कॉकटेल 2 या चित्रपटाचे ‘दिग्दर्शन होमी अदाजानिया यांनी केले आहे. तर पहिला मूळ चित्रपटात सैफ अली खान, दीपिका पदुकोण आणि डायना पेंटी यांच्या मुख्य भूमिका होत्या, त्यावेळी ही हा पहिला भाग उत्तम गाजला होता. लंडन आणि केप टाउनमधील सुंदर ठिकाणी चित्रित झालेला हा चित्रपट एका रोमँटिक ‘लव्ह ट्रँगल’वर आधारित आहे.
शाहिद (shahid)कपूर बऱ्याच काळापासून एका ‘हिट’ चित्रपटाच्या प्रतीक्षेत आहे. अर्थात, कृतीसोबतचा त्याचा आधीचा चित्रपट ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ हा व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरला होता. त्यानंतर त्याचे 2 चित्रपट तितके गाजु शकले नाहित मात्र आता ‘कॉकटेल 2’चे यश शाहिदच्या कारकिर्दीसाठी एक चांगली बातमी ठरणार आहे. रश्मिका आणि कृती सनॉननेही त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तसेच या चित्रपटातील गाणे प्रंचड प्रेक्षकांच्या पंसतीस उतरत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
रणबीर कपूर बनला आदर्श नवरा, आलिया भट्टच्या ‘अल्फा’ला अनोख्या पद्धतीने दिला पाठिंबा










