Sunday, June 8, 2025
Home बॉलीवूड केवळ लारा दत्ताचा नाही, तर ‘या’ कलाकारांनी देखील परफेक्ट लूकसाठी घेतला होता प्रोस्थेटिक मेकअपचा आधार

केवळ लारा दत्ताचा नाही, तर ‘या’ कलाकारांनी देखील परफेक्ट लूकसाठी घेतला होता प्रोस्थेटिक मेकअपचा आधार

अक्षय कुमारचा ‘बेलबॉटम’ सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आला आहे. सिनेमाचा ट्रेलर पाहून सर्वाना तो खूप आवडल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर आल्या. मात्र या ट्रेलर इतकीच किंबहुना ट्रेलरपेक्षाही अधिक चर्चा झाली ती, ट्रेलरमध्ये इंदिरा गांधींची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीची. चित्रपटात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका लारा दत्ताने साकारली आहे. या चित्रपटातील लाराचा लुक एवढा परफेक्ट आहे, की तिला ओळखणे देखील कठीण झाले आहे. जेव्हा लाराचे नाव समोर आले, तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्याचा सुखद धक्का बसला. सोशल मीडियावर तर लोकांनी मेकअप आर्टिस्टला राष्ट्रीय पुरस्कार दिल्याची मागणी केली आहे. हा चित्रपटातील लाराचा लूक पाहून पुन्हा एकदा प्रोस्थेटिक मेकअपची कमाल आपल्याला पाहायला मिळाली आहे. याआधी देखील अनेक चित्रपटांमध्ये कलाकारांवर प्रोस्थेटिक मेकअप केल्याचे आपण पाहिले, आजच्या या लेखात आपण अशाच काही कलाकारांचीच आणि चित्रपटांची नावे जाणून घेणार आहोत.

अमिताभ बच्चन – पा
‘पा’ सिनेमा आला आणि तेव्हाच प्रोस्थेटिक मेकअप ही संकल्पना सामान्य लोकांना समजली. या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचा लूक पाहून भल्याभल्यानी तोंडात बोटं घातले होते. या चित्रपटात अमिताभ यांचा मेकअप आंतरराष्ट्रीय मेकअप आर्टिस्ट क्रिस्टियन टिंसले आणि डॉमिनी टील यांनी केला. या मेकअपला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला.

रणबीर कपूर – संजू
राजकुमार हिराणी यांचा ‘संजू’ हा सिनेमा तुफान गाजला. रणबीर कपूरने यात संजय दत्तची भूमिका साकारली होती. जेव्हा रणबीरला संजयच्या लूकमध्ये पहिल्यांदा पाहिले गेले किंबहूना आजही जेव्हा पाहिले जाते, तेव्हा खरा संजय दत्त असल्याचा भास आपल्याला रणबीरला पाहून होतो. रणबीरचा मेकअप डॉ. मुरके यांनी केला होता.

राजकुमार राव – राबता
‘राबता’ या सिनेमासाठी राजकुमार रावला देखील प्रोस्थेटिक मेकअप वापरून तयार केले होते. ३२४ वर्षाच्या माणसाची भूमिका साकारणाऱ्या राजकुमारवर १६ लूक टेस्ट केल्या गेल्या. त्यानंतर त्याचा लूक फायनल झाला होता. या सिनेमात राजकुमाराला पाहून कोणालाही समजणार नाही तो नक्की कोण आहे? इतका साफ मेकअप होता त्याचा.

दीपिका पादुकोण – छपाक
मेघना गुलजार यांच्या ‘छपाक’ सिनेमासाठी दीपिका देखील ऍसिड पीडितेच्या लूक देताना प्रोस्थेटिक मेकअप लावण्यात आला होता. या मेकअपमुळे दीपिका तंतोतंत ऍसिड पीडित दिसत होती. सिनेमाच्या शेवटच्या दिवशी दीपिकानं हा मेकअप जाळून टाकला होता.

नवाझुद्दीनचा सिद्दीकी – बाळासाहेब ठाकरे
जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या बायोपिकसाठी नवाझुद्दिनला निवडण्यात आले, तेव्हा लोकांनी खूप नावे ठेवले होेते. पण जेव्हा नवाझुद्दिनचा या भूमिकेतला पहिला फोटो बाहेर आला, तेव्हा सर्वानाच धक्का बसला होता. इतका तो बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा दिसत होता.

धूम २ – ऋतिक रोशन
‘धूम २’ सिनेमात सिनेमात एक सीन आहे, जेव्हा ऋतिक एक डायमंड चोरून पळत असतो. त्या सीनमध्ये ऋतिकने एका वयस्कर सेक्युरिटी गार्डची भूमिका साकारली होती. त्याचा तो मेकअप देखील प्रोस्थेटिक होता.

शाहरुख खान – फॅन
फॅन सिनेमात शाहरुख दोन भूमिकांमध्ये दिसला. एक भूमिका त्याने आर्यनची जो सुपरस्टार असतो त्याची केली. तर दुसरी भूमिका त्याने आर्यनचा सायको फॅन असलेल्या मुलाची साकारली होती. यात त्याला फॅनच्या भूमिकेसाठी प्रोस्थेटिक मेकअप लावला गेला होता.

ऋषी कपूर – कपूर ऍंड सन्स
या सिनेमात ऋषी कपूर यांनी ९० वर्षाच्या आजोबांची भूमिका निभावली होती. त्यांना हा लूक देण्यासाठी इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट आणि ऑस्कर पुरस्कार विजेते ग्रेन कैनोम यांना बोलवण्यात आले होते.

 

कमल हसन – चाची ४२०या सिनेमात कमल यांनी लक्ष्मी नावाच्या महिलेची भूमिका साकारली होती. त्यावेळी देखील कमल यांना हा लूक प्रोस्थेटिक मेकअपने दिला गेला.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अनुष्काला पाहून विराट कोहली बनला शम्मी कपूर; सौंदर्याचे कौतुक करत म्हणतोय, ‘चांद सा रोशन चेहरा’

-तब्बल ५ मिनिटे किसींग सीन दिल्यावर बेशुद्ध झाली होती रेखा; दिग्दर्शकाने कट म्हणूनही थांबला नव्हता अभिनेता

-तेजस्विनी पंडितच्या ‘कूल ऍंड डॅशिंग’ लूकने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष, कलाकारांच्या देखील उमटतायेत प्रतिक्रिया

हे देखील वाचा