Monday, February 26, 2024

‘या’ अभिनेत्यांच्या आयुष्यात दोनवेळा प्रेमानी केली एंट्री , एकाने तर घटस्फोट न घेताच केले दुसरे लग्न

प्रेमाला सीमा नसते असं म्हणतात. त्यामुळेच पडद्यावरची व्यक्तिरेखा कोणतीही असली तरी खऱ्या आयुष्यात कलाकार जेव्हा आपला जीवनसाथी निवडतो तेव्हा तो सर्व बंधनांच्या पलीकडे असतो. बॉलिवूडमध्येही हा ट्रेंड कायम आहे. मात्र, दोन व्यक्तींच्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीची उपस्थिती नेहमीच राहिली आहे. तर आजच्या लेखात आम्ही तुम्हाला अशा स्टार्सबद्दल सांगणार आहोत जे लग्नानंतर दुसऱ्यांदा प्रेमात पडले आणि या कलाकारांनी घटस्फोट न घेता दुसऱ्यांदा लग्न केले.

अभिनेता राज बब्बरने दोनदा लग्न केले होते. राजचे पहिले लग्न नादिरा दाहीरशी झाले होते, पण नंतर ते अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या प्रेमात पडले. काही काळानंतर त्यांनी नादिराला घटस्फोट न देता स्मिताशी लग्न केले. नंतर प्रसूतीदरम्यान स्मिताचा मृत्यू झाला. यानंतर राज बब्बर आपल्या पहिल्या पत्नीकडे परतले.

या यादीत बॉलिवूड अभिनेता संजय खानच्या नावाचाही समावेश आहे. संजय खानने पहिले लग्न अभिनेत्री जरीन खानशी केले. पुढे तो झीनत अमानच्या प्रेमात पडला. पहिल्या लग्नानंतर संजय झीनत अमानच्या प्रेमात पडला होता, नंतर संजयने जरीनला घटस्फोट न देता झीनतशी लग्न केले.

या यादीत आलिया भट्टचे वडील महेश भट्ट यांचेही नाव आहे. महेश भट्ट त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. महेश भट्ट यांचे परवीन बाबीसोबत अफेअर होते. दिग्दर्शकाने तिच्याशी लग्नही केले. मात्र, नंतर महेश भट्ट सोनी राजदानच्या प्रेमात पडले, त्यानंतर त्यांनी सोनी राजदानशी लग्न केले.

या यादीत गायक उदित नारायणच्या नावाचाही समावेश आहे. उदितचे पहिले लग्न रंजना झासोबत झाले होते. पण नंतर तो दीपाच्या प्रेमात पडला आणि जेव्हा त्याने दीपाशी लग्न केले तेव्हा त्याने रंजनाला घटस्फोट दिला नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

सततच्या ट्रोलिंगने कंटाळली पूनम पांडे; म्हणाली, ‘मला एकदाची मारून टाका…’
लता मंगेशकर यांच्यासाठी ‘हे’ गाणे होते खूपच कठीण, मात्र एसपी बालसुब्रमण्यम यांच्या मदतीमुळे गाणे झाले सुकर

 

हे देखील वाचा