Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

कशी नशिबाने थट्टा मांडली! आलिशान आयुष्य सोडून कलाकार भिकाऱ्याच्या रूपात झाले पब्लिक प्लेसमध्ये स्पॉट

कलाकारांना आपल्या वेगवेगळ्या आणि हटके लूकने चर्चेत राहायला खूप आवडते. यासाठी ते वेगवेगळे पात्र साकारतात आणि अनोखी वेशभूषा करुन गर्दीच्या ठिकाणी देखील जातात. आपल्याला कोण ओळखतं का? हे त्यांना पाहायचं असतं. ते कधी भिकारी, तर कधी रस्त्यावरील फेरीवाले होऊन बसतात. असे रूप घेऊन ते आपल्या चाहत्यांना एकप्रकारे धक्काच देत असतात. या लेखात जाणून घेऊया कोण आहेत ते बॉलिवूड कलाकार जे वेगळं रूप धारण करून पब्लिक प्लेसमध्ये स्पॉट झालेत.

टायगर श्रॉफ
‘हिरोपंती’ सिनेमा आठवतोय का? या सिनेमातील डॅशिंग, दमदार आणि जबरदस्त बॉडी असलेला टायगर श्रॉफ (Tiger Shroff) या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. मुंबईत अर्जंटमध्ये टायगरला जायचं असतं. त्यावेळी तो हुडी घालून आणि तोंडाला मोठा मास्क लावून लोकलने प्रवास करतो. पायात चप्पल आणि साधी पँट घातलेला हा अभिनेता कुणाला ओळखूही येत नाही. विशेष म्हणजे टायगरने हा व्हिडिओ त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरही शेअर केला होता. अवघ्या ८ सिनेमात काम करणारा टायगर आज यशाची शिखरे चढत आहे. त्याने ऋतिक रोशन, रितेश देशमुख, मनोज वाजपेयी यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम केलंय.

सोनू निगम
एखादा कलाकार भिकारी बनलाय. असं म्हणल्यावर अनेकांच्या भुवया उंचावू शकतात, पण हे खरंय. प्रसिद्ध गायक सोनू निगम (Sonu Nigam) याने भिकाऱ्याचं रूप घेतलं होतं. यावेळी त्याच्या हातात एक पेटीदेखील असते. पेटी म्हणजे कपड्यांची पेटी नाही बरं का. वाद्यांमधली पेटी. तो ती पेटी वाजवत गाणं म्हणत असतो. त्याचं रूप असं असतं की, त्याला पाहून ओळखणं जवळपास अशक्यच असतं. कोण एवढं सुंदर गाणं गातंय हे जाणून घेण्यासाठी आजूबाजूचे लोकही त्याच्याभोवती तोबा गर्दी करतात. यानंतर तो तिथून उठून निघून जातो. एका मुलाखतीमध्ये या विषयी बोलताना सोनू निगम म्हणाला होता की, “माझ्या आयुष्यातील हा सर्वात चांगला अनुभव आहे. यावेळी एका मुलाने मला बारा रुपये दिले होते. हे पैसे माझ्यासाठी खूप अनमोल आहेत. त्यामुळे मी या पैशांची एक फ्रेम बनवली आणि ती फ्रेम माझ्या ऑफिसमध्ये आहे.”

महानायक अमिताभ बच्चन
एखाद्या कलाकारानं एखाद्या चाहत्याला असं सरप्राईज द्यावं जे सदैव त्याच्या स्मरणात राहील. असंच सरप्राईज अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी एका मुलाला दिलं होतं. आलिशान बंगला, महागड्या गाडीत फिरणारे अमिताभ आपल्या एका मुलाला सरप्राईज देण्यासाठी थेट लोकल ट्रेनमध्ये गेले होते. कारण तो मुलगा खूप छान आवाजात गाणी गायचा. त्यामुळे अमिताभ त्याचे गाणे ऐकण्यासाठी लोकलमध्ये जातात. तिथे त्याच्याशी गप्पाटप्पाही मारतात. कॅन्सरपासून मुक्त होण्यासाठी गाणी गात असलेल्या त्या मुलासोबत सगळे आनंदही घेतात. सोशल मीडियावर सक्रिय असणारे अमिताभ बच्चन यांनी यादरम्यानचे काही फोटोही शेअर केले होते. त्यांनी ते फोटो शेअर करत लिहिले होते की, “आज सकाळी सौरभला साथ देण्यासाठी लोकल ट्रेनमधून प्रवास केला, तो ट्रेनमध्ये कॅन्सरपासून मुक्त होण्यासाठी गाणे गातो. त्याला सरप्राईज दिले. कोणत्याच गोष्टीत फरक केला नाही पाहिजे. कुठे ना कुठे हिरो जे काही बोलतात, ते आपल्या काळजाला भिडतं. आणि आपलं कर्तव्य असतं की, आपण आपलं कर्तव्य पार पाडले पाहिजे.” त्यांच्या या पोस्टला लाखो लोकांनी लाईक्स आणि सकारात्मक प्रतिक्रियाही दिल्या होत्या.

दीपिका पदुकोण
२०२० साली रिलीझ झालेला ‘छपाक’ सिनेमा तर तुम्हाला आठवतच असेल. या सिनेमात अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) हिने ऍसिड अटॅक झालेल्या मुलीची भूमिका साकारली होती. हेच रूप असलेला मेकअप करत दीपिका मार्केटमध्ये जाते आणि पाहते की लोक ऍसिड अटॅक झालेल्या महिलेकडे कोणत्या नजरेने पाहतात. काही लोक तिच्यासोबत असणाऱ्या ऍसिड अटॅक झालेल्या मुलींसोबत चांगले वागतात, तर काही त्यांना बोलायचं टाळतात. यानंतर शेवटी दीपिका एक सुंदर मेसेजही देते की, “आज पूर्ण दिवस घालवल्यानंतर आम्हाला हे समजलं की, काही डोळ्यांपुढं असतं, पण दिसत नाही. आपला दृष्टीकोन बदलला पाहिजे.”

आमिर खान
आमिर खान (Aamir Khan) अनेकदा रूप बदलून असे एक्सपीरिमेंट करताना दिसला आहे. तो एकदा गेटअप बदलून दिग्गज क्रिकेटर सौरव गांगुलीला भेटण्यासाठी त्याचा फॅन बनून जातो. गांगुलीच्या घराच्या गेटवर जाऊन तो गेटवरील लोकांना विचारतो. दादा घरी आहे का? हे सौरव गांगुलीचं घर आहे का? त्यांचा फॅन आहे. त्यांच्यासोबत फोटो काढायचा आहे. तो कुठे आहे, तो कधी येणारंय. त्यावेळी ते लोक त्याला सांगतात की, दादा मॅचसाठी गेलाय.

जेव्हा ते आमिर खानला गांगुलीला भेटू देत नाहीत, तेव्हा आमिर खान कॅमेऱ्याजवळ येतो आणि म्हणतो की, दादाशी भेटायला आलो, पण मला भेटू देत नाहीयेत. मी दादाचा फॅन आहे, मला ऑटोग्राफ आणि फोटोग्राफ पाहिजे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

साधीसुधी नव्हती बॉलिवूडमधली ‘ही’ भांडणं, सलमान आणि शाहरुखने खणाखण वाजवलेली कानाखाली

बंदी घातलेल्या ‘या’ जाहिरातींमध्ये मांडला होता अश्लीलतेचा बाजार, अरबाज अन् मलायकाच्या ऍडचाही समावेश

आख्ख्या जगाने पाहिला उघडा झालेला रणवीर, पण पत्नी दीपिकाला काय वाटतंय? एकच रंगलीय चर्चा

हे देखील वाचा