Sunday, May 19, 2024

बंदी घातलेल्या ‘या’ जाहिरातींमध्ये मांडला होता अश्लीलतेचा बाजार, अरबाज अन् मलायकाच्या ऍडचाही समावेश

टीव्ही पाहताना किंवा सोशल मीडियावर आपण सर्रास जाहिराती पाहातो. खरंतर जाहिराती पाहण्याशिवाय कधीकधी गत्यंतरही नसते, पण तरीही सातत्याने डोळ्यांसमोर त्याच त्याच जाहिराती येत असल्याने त्या परिणामकारकही ठरतातच. अनेकदा तर एखादी गोष्ट त्याच्या जाहिरातींमुळे लक्षातही राहाते. मात्र, काही जाहिराती आशा असतात, ज्यामुळे अनेकदा वादही होतात. काही जाहिरातींवर बंदीही येते, तर मंडळी आपण त्याच काही जाहिरातींवर नजर टाकू ज्यांच्यामुळे वाद झाले होते.

नव्वदच्या दशतकाच्या सुरुवातीला अरबाज खान (Arbaaz Khan) आणि मलायका अरोरा (Malaika Arora) यांची एक जाहिरात आली होती. मिस्टर कॉफीची ही जाहिरात होती. या जाहिरातीत तेव्हाचे खऱ्या आयुष्यातील जोडीदार असलेल्या अरबाज आणि मलायका यांची चांगली केमिस्ट्री दिसून आलेली, पण या जाहिरातीत सेक्स फँटसी दाखवण्यात आल्याने भारतात दाखवण्यात आली नव्हती.

काही वर्षांपूर्वी तनिष्क या ब्रँडच्या एकत्वम ज्वेलरीची जाहीरात आली होती. यात मुस्लिम कुटुंब आपल्या हिंदू सुनेच्या डोहाळजेवणाचे आयोजन करतात. या जाहिरातीत दोन धर्मांमधील एकता दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, पण काही लोकांकडून या जाहिरातीवर जोरदार टीका झाली. त्यामुळे काही दिवसातच ही जाहिरात बंद करण्यात आली.

कोरोना व्हायरसच्या काळात स्वच्छतेच्या बाबतीतील अनेक जाहिराती आल्या होत्या. त्यात केंट रोने देखील एक ग्राफिक्समधून त्यांच्या आटा आणि ब्रेड मेकरची जाहिरात प्रसिद्ध केली होती. पण या जाहिरातीतून माणसांच्या वर्गातील भेदभाव दाखवल्यामुळे त्यावर खूप टीका झाली होती. या जाहिरातीत म्हटले होते की, तुमची मोलकरीण पीठ मळते का? तिच्या हाताला जंतू असू शकतात. यातून गरजू आणि कामगार लोकांच्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा आरोप झाला होता. त्यामुळे अखेर केंटला माफी मागावी लागली होती आणि ही जाहिरात काढून टाकावी लागलेली.

सन २००७ मध्ये अमूल माचोची वादग्रस्त जाहिरात आली होती. या जाहिरातीत एक स्त्री कपडे धूवत असताना तिच्या नवऱ्याचे अंडरगारमेंट्स पाहून अश्लील हावभाव करत असते. तसेच, आजूबाजूच्या बायकाही आश्चर्याने आणि वासनेने पाहत असतात. सना खानने या जाहिरातीत काम केले होते. ही जाहिरात प्रचंड टिकेची धनी ठरली होती. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ही जाहिरात ‘अशोभनीय, अश्लील असल्याचे म्हटले होते आणि जाहिरातीवर बंदी आणली होती.

तसेच २००८ साली एक्सची एक जाहिरात आलेली, ज्यात डियो मारल्यावर एक तरूण चॉकलेट मॅन बनतो. त्यानंतर अनेक युवा महिला त्याच्याकडे आकर्षित होतात आणि त्याच्या शरिराचे भाग चॉकलेट असल्यासारखे चाखतात. यातून असे दाखवायचे असावे की, या एक्स डिओमुळे महिला युवकांकडे आकर्षित होतात. मात्र, या जाहिरातीबद्दल अनेक तक्रारी आल्याने ही जाहिरातही बंद करण्यात आली होती.

वाईल्ड स्टोन डिओच्या २००७ मध्ये आलेल्या जाहीरातीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या जाहिरातीत बंगाली स्त्री दुर्गा पुजेवेळी एका व्यक्तीच्या डिओच्या सुवासाने त्याच्याकडे आकर्षित होते असे दाखवले होते. त्यावर मोठा वाद झाला होता आणि कठोर सेंन्सरखालून गेल्यानंतर ही जाहीरात दाखवण्यात आली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

आख्ख्या जगाने पाहिला उघडा झालेला रणवीर, पण पत्नी दीपिकाला काय वाटतंय? एकच रंगलीय चर्चा

रणवीरच्या न्यूड फोटोशूटवर भडकली अभिनेत्री; म्हणाली, ‘हेच जर महिलेने केले असते, तर तिचे घर जाळले असते’

‘आता कोणाचं घर जाळणार?’, म्हणत ढसाढसा रडली प्रसिद्ध अभिनेत्री; व्हिडिओ होतोय व्हायरल

हे देखील वाचा