भूमिका कोणतीही असूद्या त्यात कलाकार स्वत:ला झोकून देऊन ते पात्र पडद्यावर जिवंत करतो म्हणजे करतोच. बॉलिवूडमध्येही असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी पठडीबाहेरील भूमिका साकारून प्रेक्षकांचंही लक्ष वेधून घेतलंय. पुरुष आणि महिलांच्या भूमिका तर कोणताही कलाकार करतो, पण ट्रान्सजेंडर, समलैंगिकाच्या भूमिका करणारेही बरेच कलाकार बॉलिवूडमध्ये आहेत. तर कोणते आहेत ते कलाकार आणि त्यांनी कोणत्या वेबसीरिज किंवा सिनेमात काम केलंय? हे आपण आजच्या या लेखातून जाणून घेणार आहोत.
बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्रींच्या यादीतील एक नाव म्हणजे वाणी कपूर. तिने काही सिनेमात बोल्ड आणि लव्ह मेकिंग सीन दिलेत. ‘चंदीगढ करे आशिकी’ या सिनेमात तिने बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता आयुष्यमान खुराणासोबत काम केलंय. वाणीने या सिनेमात ट्रान्सजेंडरची भूमिका साकारली होती. आधीपासूनच प्रसिद्ध असलेल्या वाणीला या भूमिकेमुळे आणखी प्रसिद्धी मिळाली. याच सिनेमात तिच्यासोबत असलेला आयुष्मानदेखील काही कमी नाही. तोदेखील नेहमीच वेगवेगळ्या भूमिका साकारण्यासाठी ओळखला जातो. त्याने ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या सिनेमात समलैंगिकाची भूमिका साकारली होती. या सिनेमात ‘कोटा फॅक्टरी’ फेम प्रसिद्ध अभिनेता जितेंद्र कुमारही समलैंगिकाच्या भूमिकेत होता. दोघांचा किसींग सीनही यात दाखवण्यात आला होता.
‘मिर्झापूर’ या गाजलेल्या वेबसीरिजमधील गुड्डू भैयाची दमदार व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता म्हणजे अली फजल. त्यानेही ‘फॉरबिडन लव्ह’ सीरिजमध्ये समलैंगिकाची भूमिका साकारली होती. या वेबसीरिजमध्ये ओंकार कपूर आणि अलीने बेड सीनही शेअर केला होता. त्यावेळी या सीनची चांगलीच चर्चा झाली होती.
इतकंच नाही, तर जॉन अब्राहम, अभिषेक बच्चन आणि प्रियांका चोप्रा अशी तगडी स्टारकास्ट असणारा ‘दोस्ताना’ हा समलैंगिकतेवर आधारित असणारा पहिला बिग बजेट सिनेमा ठरला. हा सिनेमा हलक्याफुलक्या आणि गमतीदार पद्धतीने दाखवण्यात आला होता. या सिनेमात किरण खेर यांच्या माध्यमातून समलैंगिकतेविषयी भारतीय पालक कशा पद्धतीने टोकाचा प्रतिसाद देतात हे दाखवलंय. जेव्हा जॉन अब्राहमने या सिनेमात समलैंगिकांची भूमिका साकारली, तेव्हा एकच खळबळ उडाली होती. या सिनेमात या दोघांमध्ये किसींग सीनही शूट करण्यात आला होता. सिनेमात हे दोघे सुद्धा प्रियांकाच्या प्रेमात असल्याचं दाखवलंय. पण तिला सांगण्याची डेरिंग त्यांच्यात नव्हती. म्हणून त्यांनी ही समलैंगिकाची खोटी खोटी भूमिका साकारली होती. त्यानंतर त्यांनी याबाबत उघड केल्याचं देखील दिसतंय.
पुढे अर्जुन माथूर आणि विक्रांत मेस्सी हे त्यांच्या ‘मेड इन हेव्हन’ या वेबसीरिजमधील बोल्ड कंटेंटमुळे चर्चेत होते. या वेबसीरिजमध्ये विक्रांत आणि अर्जुनने असे काही बोल्ड सीन्स दिले होते, जे खूपच आश्चर्यचकित करणारे होते.
यादीतील पुढील कलाकार म्हणजे सत्यदीप मिश्रा आणि मृणाल दत्त. यांनी अल्ट बालाजीची प्रसिद्ध वेबसीरिज ‘हिज स्टोरी’ मध्ये समलैंगिक भूमिका साकारल्या होत्या. एवढंच नाही, तर या वेबसीरिजमध्ये या दोघांच्यात खूप जवळीक दाखवण्यात आलीये. वेबसीरिजमध्ये सत्यदीपचं प्रियामणीसोबत लग्न झालेलं असतं आणि त्यांना २ मुलंही असतात. सगळं एकदम व्यवस्तिथ सुरू असताना सत्यदीप हा समलैंगिक आहे, असं समजतं आणि मग नंतर पुढे जाऊन ते हे नातं थांबवण्याचा निर्णय घेतात. नंतर सत्यदीप हा मृणाल दतच्या प्रेमात पडतो आणि त्या दोघांचं अफेअर असतं. पण हे त्याच्या मोठ्या मुलाला हे मान्य नसतं.