Sunday, December 8, 2024
Home बॉलीवूड Ek Villian Returns | चित्रपटाचे ‘गलियाॅं रिटर्न्स’ गाणे रिलीझ, पुन्हा वेड लावतोय अंकित तिवारीचा आवाज

Ek Villian Returns | चित्रपटाचे ‘गलियाॅं रिटर्न्स’ गाणे रिलीझ, पुन्हा वेड लावतोय अंकित तिवारीचा आवाज

बॉलिवूडमधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक ‘एक व्हिलन रिटर्न्स’ अखेर या महिन्यात २९ जुलै रोजी चित्रपटगृहात दाखल होत आहे. मागील चित्रपटाची कथा आणि त्यातील स्टारकास्टच्या दमदार अभिनयाने प्रभावित होऊन प्रेक्षक गेली आठ वर्षे याच्या सिक्वलची वाट पाहत होते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर त्याच्या चाहत्यांना आशा होती की, चित्रपटाच्या पहिल्या भागातील ‘गलियां’ हे गाणे देखील लवकरच ऐकायला मिळेल. चाहत्यांची इच्छा पूर्ण करत निर्मात्यांनी आज चित्रपटाचे पहिले गाणे ‘गलियां रिटर्न्स’ रिलीझ केले आहे. ट्रेलरप्रमाणेच लोकांना चित्रपटातील गाणेही खूप आवडले आहे, ज्यामुळे हे गाणे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

जॉन अब्राहम (John Abraham), अर्जुन कपूर (Arjun Kapoor), दिशा पटानी (Disha Patani) आणि तारा सुतारिया (Tara Sutaria) अभिनित चित्रपट ‘एक व्हिलन रिटर्न्स’चे पहिले गाणे ‘गलियां रिटर्न्स’ आज म्हणजेच ४ जुलै रोजी यूट्यूबवर रिलीझ झाले आहे. प्रेक्षकांना हे गाणं खूप आवडतंय. हे गाणे ऐकून पहिल्या चित्रपटाच्या आठवणी लोकांच्या मनात ताज्या होत आहेत. हे गाणे रिलीझ होताच सहा लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. एवढेच नाही, तर अंकित तिवारीच्या (Ankit Tiwari) आवाजाने सजलेल्या या गाण्यावर प्रेक्षक कमेंट करत त्याचे कौतुकही करत आहेत. (ek villain returns first song galliyan returns out)

विशेष म्हणजे पहिल्या चित्रपटातील ‘गलियां’ हे गाणेही प्रेक्षकांना खूप आवडले होते. पहिल्या गाण्यात श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) ​​यांची केमिस्ट्री दाखवण्यात आली होती. तर आज रिलीज झालेल्या गाण्यात दिशा पटानी-जॉन अब्राहम आणि तारा सुतारिया-अर्जुन कपूरची स्टाइल पाहायला मिळत आहे. श्रद्धा कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांच्यावर चित्रित करण्यात आलेले ते गाणे देखील अंकित तिवारीने गायले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा