Thursday, April 24, 2025
Home भोजपूरी आहा कडकच ना! नववधूच्या अवतारात दिसली अभिनेत्री आम्रपाली दुबे, स्टेजवर केला नवरदेवासोबत रोमान्स

आहा कडकच ना! नववधूच्या अवतारात दिसली अभिनेत्री आम्रपाली दुबे, स्टेजवर केला नवरदेवासोबत रोमान्स

भोजपुरी इंडस्ट्रीतील अभिनेत्री आम्रपाली दुबेला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. तिचे चित्रपट चाहत्यांमध्ये हिट आहेत. जेव्हाही ती सुपरस्टार निरहुआ म्हणजेच दिनेश लाल यादवसोबतच्या चित्रपटात दिसली आहे, तेव्हा त्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. आम्रपाली आणि निरहुआ ही भोजपुरी इंडस्ट्रीतील हिट जोडी आहे. चित्रपटांपासून सोशल मीडियापर्यंत दोघांची चर्चा असते. अशा परिस्थितीत दोन्ही चित्रपटांचे चाहतेही आतुरतेने वाट पाहत आहेत, पण आता आम्रपालीचा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. जो पाहून चाहत्यांचे भान हरपल्याशिवाय राहणार आहे. या व्हिडिओमध्ये आम्रपाली लग्न करताना दिसत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे नवरदेव निरहुआचा धाकटा भाऊ प्रवेश लाल यादव आहे.

आम्रपालीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये आम्रपाली आणि प्रवेशलाल वधू-वरांच्या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत आहेत आणि दोघेही लग्नाच्या स्टेजवर बसले आहेत. व्हिडिओमध्ये दोघे स्टेजवर रोमँटिक डान्स करताना दिसत आहेत. यानंतर दोघेही एकमेकांच्या नजरेत हरवून जातात. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला ‘दिन शगना दा’ हे गाणे वाजत आहे. ज्यामुळे हा व्हिडिओ अधिक सुंदर दिसत आहे. आम्रपाली आणि प्रवेश लालच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून प्रचंड प्रतिक्रिया येत आहे. अनेकांनी दोघांचे अभिनंदन केले आहे, तर काही लोक मोठा भाऊ निरहुआसोबत फसवणूक झाल्याची चर्चा करत आहेत.

आम्रपाली आणि प्रवेश लाल यादव यांचा हा व्हिडिओ खऱ्या लग्नाचा नाही. हा व्हिडिओ तिच्या आगामी ‘साजन’ चित्रपटाच्या सेटचा आहे, ज्याला आम्रपालीने कॅप्शन देत “साजन,” असे लिहिले आहे.

आम्रपालीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काही तासांत तो २८ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. यावरून आम्रपाली आणि प्रवेश लाल यांना पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अलीकडेच आम्रपालीने तिच्या वाढत्या वजनाबाबत पोस्ट केली होती. आम्रपालीने सांगितले होते की, कोव्हिडनंतर तिचे वजन वाढले होते, पण आता ती योगाद्वारे हळूहळू वजन कमी करत आहे. आम्रपाली भोजपुरी इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. तिला चित्रपटात घेण्यासाठी दिग्दर्शक रांगेत बसले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिजीत बिचुकलेला कोरोनाची लागण, ‘बिग बॉस १५’ मध्ये न घेण्याचा निर्मात्यांचा निर्णय

-वाघीण आली परत, सुष्मिता सेनच्या बहुप्रतीक्षित ‘आर्या २’ वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

-ग्लोबल ट्रेंडिंग कपल असणाऱ्या प्रियांका चोप्रा आणि निक जोनासची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होती पांढरे

हे देखील वाचा