Tuesday, May 28, 2024

अदा शर्माने गाणं म्हणत दिल्या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा, अभिनेत्रीचा खास व्हिडिओ एकदा पाहाच

साऊथ आणि बॉलिवूड चित्रपटात काम केलेली प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे अदा शर्मा होय. अदाची गणना सर्वात फिट अभिनेत्रींमध्ये केली जाते. तिचे योगा आणि वर्क आऊट करतानाचे नेहमीत व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ती जेव्हाही वर्क आऊट करताना व्हिडिओ शेअर करत असते. या सोबतच ती तिच्या एका वेगळ्याच स्टाईलमुळे देखील चर्चेत असते. आता देखील अदाचा एका व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये अदा गाणं म्हणताना दिसत आहे.

अदा (Adah Sharma)  सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या व्हिडिओवर चाहते कमेंट आणि लाइकचा वर्षाव करत असतात. अदाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती स्वत: गांण म्हणत आहे. अदाने ‘रखुमाई रखुमाई’ गाणं गात आषाढी एकादशीच्या चाहत्यांना खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अदाने व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. विठ्ठल विठ्ठल गजर नामाचा” तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चाहते भन्नाट कमेंट करत आहेत. तिच्या या व्हिडिओवर काही तासांमध्ये लाखो लाईक आले आहेत. अदाचे इन्स्टाग्रामवर 8 मिलियनहून अधिक फाॅलवर्स आहे.

अदाच्या या व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, “एवढी फेमस होवून सुद्धा आपली मराठी जपली आहेस तू… अभिमानास्पद आहे हे” दुसऱ्याने लिहिले की, “एकच हृदय आहे ओ कितीवेळा जिंकणार…” तर इतर काहीनी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Adah Sharma (@adah_ki_adah)

अभिनेत्री अदा शर्मा विषयी सांगायच झाल तर, अदाने 2008 साली तिच्या करिअरची सुरुवात केली होती. त्यावेळी अदा 16 वर्षाची होती. अदाला त्यावेळी हिंदी चित्रपटात फार यश मिळाले नाही. त्यानंतर तिने साऊथ इंडस्ट्रीत पदार्पण केले. तिने 2014 साली ‘हार्ट अटॅक’ या चित्रपटात तेलुगू चित्रपट सृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर ती अल्लू अर्जुनसोबत ‘सन ऑफ सत्यमुर्ती’ या चित्रपटात झळकली होती. नुकतीच ती ‘दे केरला स्टोरी’ चित्रपटात झळकली होती. (Actress Adah Sharma gave her best wishes on the occasion of Ashadhi Ekadashi in ‘this’ way)

अधिक वाचा- 
ऐंशीच्या दशकात केली होती करियरची दमदार सुरूवात; आता ‘पिंकी बुआ’ बनुन उपासना सिंग करतात प्रेक्षकांना लोटपोट
रवी किशनची लेक बनली’अग्निवीर’, अनुपम खेर कौतुकाचा वर्षाव करत म्हणाले, ‘तिचे हे पाऊल…’

हे देखील वाचा