Thursday, June 13, 2024

ब्रेकिंग! अभिनेत्री अदा शर्माची अचानक बिघडली तब्येत, धक्कादायक कारण आले समोर

हिंदी सिनेसृष्टीतून धक्कादायक बातमी समोर येत आहे. बॉलिवूड सुपरहिट सिनेमा ‘द केरळ स्टोरी’ फेम अभिनेत्री अदा शर्मा हिची तब्येत अचानक बिघडली आहे. वृत्तांनुसार, तिला फूड ऍलर्जी आणि डायरियामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिनेत्री सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. या बातमीने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

अदा शर्मा (Adah Sharma) हिच्या जवळच्या व्यक्तीने माध्यमांशी बोलताना तिच्या तब्येतीविषयी माहिती दिली. त्या व्यक्तीने सांगितले की, अभिनेत्रीला आगामी ‘कमांडो’ शोच्या प्रमोशनपूर्वी मंगळवारी (दि. 01 ऑगस्ट) तातडीने रुग्णालयात न्यावे लागले. तिला डायरिया आणि फूड ऍलर्जी झाल्याचे निष्पन्न झाले.

‘कमांडो’ वेबसीरिजमध्ये दिसणार अभिनेत्री
अभिनेत्रीच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले की, “आज सकाळी तिला ताण आणि डायरियाचा त्रास झाला. सध्या ती डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे.” अदा ‘कमांडो’ (Commando) वेबसीरिजचे प्रमोशन करताना दिसली होती. या सीरिजमध्ये ती ‘भावना रेड्डी’ या भूमिकेत आहे. ‘कमांडो’ ही नवीन ऍक्शन-थ्रिलर सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अदासोबत मुख्य भूमिकेत अभिनेता प्रेम परीजा (Prem Parija) आहे.

पुन्हा एकदा विपुल शाहसोबत दिसली अभिनेत्री
‘द केरळ स्टोरी’ सिनेमाच्या यशानंतर आता अदा शर्मा आणि विपुल शाह पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. विपुल यांनी या सीरिजचे दिग्दर्शन केले आहे. यामध्ये वैभव तत्ववादी, श्रेया सिंग चौधरी, अमित सियाल, तिग्मांशू धुलिया, मुकेश छाब्रा आणि इश्तेयाक खान यांचाही समावेश आहे.

केव्हा होणार रिलीज?
‘कमांडो’ या फ्रँचायझीची सुरुवात 2013मध्ये ‘कमांडो: अ वन मॅन आर्मी’ या सिनेमापासून झाली होती. यामध्ये विद्युत जामवाल याने मुख्य भूमिका साकारली होती. मागील काही वर्षांमध्ये ही फ्रँचायझी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. अशात वेबसीरिजची निर्मिती विपुल शाह आणि सनशाईन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडने केली आहे. ही वेबसीरिज लवकरच डिझ्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. (actress adah sharma health suddenly worsened admitted to hospital know reason here)

हेही वाचा-
दिग्दर्शकाच्या निधनामुळे अक्षय कुमारला धक्का! उचलले ‘हे’ पाऊल, लगेच वाचा
Suicide: 252 कोटींच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबले होते नितीन देसाई, विनोद तावडेंनी दिलेला ‘हा’ सल्ला

हे देखील वाचा