अभिनेत्री अदा शर्माला बॉलिवूडमध्ये नवीन ओळख देणारा आणि तिच्या करियरला मोठी झेप मिळवून देणारा ‘द केरला स्टोरी’ हा सिनेमा नक्कीच कायम तिच्या आयुष्यात खास असेल. या सिनेमाचा ट्रेलर आल्यानंतर सिनेमावर अनेक टीका झाल्या. सिनेमात मुस्लिम समुदायाकडून हिंदूंच्या मुलींचे होणारे धर्मपरिवर्तन आणि पुढे घडणाऱ्या अनेक धक्कादायक गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. अनेकांनी याला खोटा आणि काल्पनिक असल्याचे म्हटले. मुस्लिम समुदायाकडून देखील या सिनेमावर टीका झाली. अनेक मोठ्या आणि दिग्गज कलाकारांनी देखील यावर टीका केली होती. द केरला स्टोरी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत अनेक रेकॉर्ड मोडले. सिनेमावर टीका करणाऱ्यांमध्ये प्रतिभावान अभिनेते कमल हसन आणि नसिरुद्दीन शहा यांचा देखील समावेश होता. आता या सिनेमात मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारणाऱ्या अदा शर्माने या दोघं अभिनेत्यांना उत्तर दिले आहे.
कमल हसन यांनी या सिनेमाला प्रोपागंडा ठेऊन बनवण्यात आले असल्याचे म्हटले होते. तर नसिरुद्दीन साहेबांनी या सिनेमाला हा एक डेंजरस ट्रेंड असल्याचे सांगितले होते. यावर आता अदा शर्माने सांगितले की, “मी बोलण्याच्या स्वातंत्र्यावर विश्वास ठेवते. आपल्या देशात आपले विचार स्पष्ट शब्दात मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. चित्रपटाला न बघता कोणत्याही निर्णयावर पोहचणे चुकीचे आहे. सिनेमाला विशिष्ट्य लेबल लावून लोकांमध्ये काही बोलणे योग्य नाही.” असे तिने म्हटले आहे.
दरम्यान अदा शर्मा एक बॉलिवूड आणि टॉलिवूड अभिनेत्री असून तिने १९२० या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र या सिनेमामुळे तिला मोठी ओळख तर मिळाली सोबतच तिने ती ताकदीची अभिनेत्री असल्याचे देखील सिद्ध केले आहे.
अधिक वाचा-
– सुयश टिळकची पत्नी ‘या’ हिंदी मालिकेत करणार एण्ट्री; आयुषी म्हणाली…
–काळ्या रंगाच्या शॉर्ट वनपीसमधील जान्हवीचा हटके लूक व्हायरल