Monday, June 23, 2025
Home बॉलीवूड पाकिस्तानचा निर्लज्जपणा! हॉटेलमध्ये ग्राहकांना बोलावण्यासाठी केला आलिया भट्टच्या व्हिडिओचा वापर, संतापले नेटकरी

पाकिस्तानचा निर्लज्जपणा! हॉटेलमध्ये ग्राहकांना बोलावण्यासाठी केला आलिया भट्टच्या व्हिडिओचा वापर, संतापले नेटकरी

नेहमीच नवनवीन कुरघोड्या करुन चर्चेत येणाऱ्या पाकिस्तान राष्ट्राने केलेला आणखी एक असभ्य प्रकार समोर आला आहे. यावेळी पाकिस्तानने अभिनेत्री आलिया भट्टच्या (Alia Bhatt) एका चित्रपटातील सीनचा चुकीचा वापर केला आहे. पाकिस्तानमधील एका हॉटेल चालकाने हा प्रकार केल्याचे निदर्शनास आले आहे. हॉटेलमध्ये ग्राहकांना बोलावण्यासाठी आलिया भट्टच्या ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटातील एक सीन लावण्यात आला आहे. ज्यामध्ये आलिया आजा ना राजा म्हणताना दिसत आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर यावर चौफेर टिका होताना दिसत आहे.

पाकिस्तानधील एका हॉटेल बाहेर लावलेला या बोर्डचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर सध्या जोरदार टिका होताना दिसत आहे. अशाप्रकारे एखाद्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा अपमान करणे योग्य नाही असे म्हणत नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर सडकून टिका केली आहे. हा सीन संजय लिला भन्साळी यांच्या गंगुबाई काठियावाडी या चित्रपटातील असून यामध्ये आलिया भट्टने वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेची भूमिका साकारली होती. चित्रपटात आलिया भट्टवर ती तिच्या ग्राहकांना बोलावण्यासाठी खास शब्दांचा शैलीचा वापर करत असल्याचे दाखवण्यात आले होते.

याच व्हिडिओचा चुकीच्या पद्धतीने वापर करत हॉटेलच्या ग्राहकांना  बोलावत असल्याचे दाखवण्यात आले आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी जोरदार टिका केली आहे. कराचीमध्ये असलेल्या हॉटेल चालकाने अशा प्रकारे स्त्रीयांचा अपमान केल्याचे म्हणत नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार निशाणा साधला आहे.परंतु असे असले तरीही अद्याप हॉटेल चालकांकडून हा व्हिडिओ हटवण्यात आलेला नाही.

हे देखील वाचा