Latest Posts

गुलाबी साडीत ‘जलेबी बाई’ बनून थिरकली आलिया भट्ट, डान्स व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल


कोरोनामुळे जरी लॉकडाऊन असले, तरीही कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये अनेक विवाहसोहळे संपन्न होत आहेत. याला चित्रपटसृष्टी देखील अपवाद नाही. कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात अनेक विवाहसोहळे मनोरंजन विश्वात पार पडले. अनेक कलाकारांनी या लॉकडाऊनच्या वेळेचा वापर करत आपली लगीनगाठ बांधली. कलाकारांसोबतच त्यांच्या घरात किंवा मित्रपरिवारात देखील अनेक लग्न झाले. बॉलिवूडची क्यूट आणि ‘बबली गर्ल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आलिया भट्टच्या मैत्रिणीचा देखील लग्नसोहळा राजस्थानमधल्या जयपूरमध्ये झाला. यावेळी आलिया देखील उपस्थित होती. या लग्नसोहळ्यात एका थ्रोबॅक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

आलिया भट्ट अनेकवेळा तिच्या गर्लगॅंगसोबत बाहेर जेवायला, सुट्ट्यांसाठी जात असते. याचे अनेक फोटो ती तिच्या मैत्रिणी सोशल मीडियावर टाकत असतात. तिचे तिच्या मैत्रिणीसोबतचे बाँडिंग आणि त्यांची मैत्री यातून स्पष्ट दिसते. आलियाने काही महिन्यांपूर्वी तिच्या मैत्रिणीच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती. या लग्नात आलियाने संगीत समारंभात जबरदस्त ग्रुपडान्स केला होता. याच डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर गाजत आहे. आलियाने जलेबी बाई गाण्यावर जोरदार आकांक्षा रंजन कपूर, देविका आडवाणी, कृपा मेहता, मेघना गोयल यांच्यासोबत डान्स केला. या डान्ससोबतच गुलाबी रंगाच्या साडीतील आलियाचा लूक देखील फॅन्सला आवडत आहे.

विरल भयानी या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत लाखों लोकांनी पहिला असून तितक्याच कमेंट्स देखील यावर येत आहेत. आलिया नुकतीच तिच्या मैत्रिणी आणि बहीण शाहीन यांच्यासोबत मुंबईत एका हॉटेलबाहेर लंच करून बाहेर पडताना दिसली होती. तिचा हा व्हिडिओ आणि या व्हिडिओमधील तिचा लूक देखील खूप व्हायरल झाला आहे.

आलियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर आलिया आगामी काळात अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’ हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज असून यात आलियासोबतच रणबीर कपूर आणि अमिताभ बच्चन दिसणार आहेत, तर तिचा दुसऱ्या सिनेमा म्हणजे संजय लीला भन्साळी यांचा ‘गंगुबाई काठियावाडी’ याचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून आलियाच्या अभिनयाचे खूप कौतुक केले जात आहे. आलियाचा तिसरा सिनेमा म्हणजे ‘आरआरआर.’ एसएस राजामौली यांच्या या सिनेमात आलिया सीता ही भूमिका साकारणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तुम्ही त्याचा टीआरपीसाठी वापर केला आणि…’, पवनदीपच्या परफॉर्मन्सवर कात्री चालवणाऱ्या निर्मात्यांवर भडकले चाहते

-‘…सर्वकाही डोळ्यात असतं!’, म्हणत मराठमोळ्या अमृता खानविलकरचं ब्लॅक ऍंड व्हाईट फोटोशूट आलं चर्चेत

-घरामध्ये आई जया बच्चनला नाही, तर बायको ऐश्वर्याला घाबरतो अभिषेक बच्चन, बहीण श्वेताने केला खुलासा


Latest Posts

spot_imgspot_img

Don't Miss