‘तुम्ही त्याचा टीआरपीसाठी वापर केला आणि…’, पवनदीपच्या परफॉर्मन्सवर कात्री चालवणाऱ्या निर्मात्यांवर भडकले चाहते


टीव्हीवरील सर्वात प्रसिद्ध आणि चर्चेत असलेल्या शोपैकीच एक म्हणजे ‘इंडियन आयडल १२’ हा सिंगिंग रियॅलिटी शो होय. या शोचा सध्या १२ वा हंगाम सुरू आहे. या शोने आतापर्यंत अनेक गायक इंडस्ट्रीला दिले आहेत. विशेष म्हणजे सध्या या शोमधील स्पर्धक आपल्या आवाजाने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण करत आहेत. मात्र, दुसरीकडे शोचे निर्माते टीआरपीसाठी असे काही करतात, ज्यामुळे त्यांना प्रेक्षकांच्या रोषाचा सामनाही करावा लागतो. हा हंगाम चांगलाच वादाने भरलेला आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. शनिवारी (१२ जून) झालेल्या एपिसोडमध्ये सर्व स्पर्धकांनी हिमेश रेशमियाला ट्रिब्यूट दिले होते. यादरम्यान सर्व स्पर्धकांनी हिमेशचे गाणे गायले. दरम्यान अधिकतर स्पर्धकांनी हिमेशचे दोन किंवा तीन गाणे गायले, तर पवनदीप राजनने केवळ त्याचे एकच गाणे गायले.

पवनदीप राजनने सलमान खानचे ‘तेरे नाम’ हे सुपरहिट गाणे गायले होते. यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी ‘इंडियन आयडल १२’ च्या निर्मात्यांवर पुन्हा एकदा निशाणा साधत ट्रोल करण्यास सुरुवात केली. चाहत्यांनी म्हटले की, “इंडियन आयडल १२’च्या निर्मात्यांनी जाणूनबुजून पवनदीप राजनच्या परफॉर्मन्सवर कात्री चालवली आहे.”

यासोबत निर्मात्यांनी पवनदीपचे काही गाणी हटवली आहेत. एका युजरने लिहिले की, “निर्लज्जपणालाही काही मर्यादा असतात…. तुम्ही त्याचा टीआरपीसाठी वापर केला आणि आता जेव्हा इतर प्रतिस्पर्धी प्रसिद्धी मिळवत आहेत, तेव्हा आपण शोच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर त्याला बाजूला सारत आहात. लाज वाटली पाहिजे तुम्हाला.” याव्यतिरिक्त इतर अनेक युजर्सनी शोच्या निर्मात्यांवर ताषेरे ओढले आहेत.

इंडियन आयडल १२ मधून काही काळ गायब होता हिमेश रेशमिया
‘इंडियन आयडल १२’ शो आपल्या गाण्यांसोबतच परीक्षकांच्या गायब झाल्यामुळेही चर्चेत होता. नेहा कक्कर, हिमेश रेशमिया आणि विशाल दादलानी हे तिन्ही परीक्षक वीकेंड एपिसोडमधून गायब होते. त्यामुळे प्रेक्षकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले. तिन्ही परीक्षक गायब झाल्यानंतर अनु मलिक आणि गीतकार मनोज मुंतशिर यांनी परीक्षकांची जबाबदारी सांभाळली. तरीही, विशाल आणि नेहा शोमध्ये दिसले नव्हते. याचे कारण तर सर्वांना माहिती पडलेच. मात्र, हिमेश एपिसोडमधून गायब का झाला होता, हे कोणालाही समजले नाही. सध्या हिमेश शोमध्ये परतला आहे आणि अनु मलिकसोबत शोचे परीक्षण करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘…सर्वकाही डोळ्यात असतं!’, म्हणत मराठमोळ्या अमृता खानविलकरचं ब्लॅक ऍंड व्हाईट फोटोशूट आलं चर्चेत

-घरामध्ये आई जया बच्चनला नाही, तर बायको ऐश्वर्याला घाबरतो अभिषेक बच्चन, बहीण श्वेताने केला खुलासा

-या टॉप बॉलिवूड अभिनेत्रींच्या नवऱ्यांना डेट करू इच्छिते भूमी पेडणेकर; नाव ऐकाल तर व्हाल हैराण


Leave A Reply

Your email address will not be published.