Monday, June 17, 2024

बाबो! ‘आरआरआर’मध्ये फक्त १५ मिनिटांच्या रोलसाठी आलियाने घेतले चक्क ‘इतके’ कोटी रुपये

ब्लॉकबस्टर ‘बाहुबली’ चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा आगामी ‘आरआरआर’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. हा मल्टीस्टारर चित्रपट पाहण्यासाठी देशभरातील प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘आरआरआर’ या चित्रपटात सुपरस्टार रामचरण आणि ज्युनिअर एनटीआर मुख्य भूमिकेमध्ये दिसत आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात ती ‘सीता’ची भूमिका करत आहे. यामध्येच आलियाबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. या चित्रपटात खूप छोटी भूमिका मिळाली असली, तरीही त्यासाठी तिने घेतलेले मानधन नक्कीच सर्वांच्या भुवया उंचावणारे आहे. (Actress Alia Bhatt Will Act For 15 Minutes In Rajamouli RRR And She Is Getting 6 Crore For Small Role)

माध्यमांतील वृत्तांनुसार, राजामौली यांच्या चित्रपटामध्ये आलिया फक्त १५ मिनिटांसाठी दिसणार आहे. ‘आरआरआर’ हा ‘स्टुडंट ऑफ द इयर’ चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्रीचा पहिला तेलुगू चित्रपट आहे, ज्यातून तिने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. हिंदी प्रेक्षक असा विचार करत होते की, या चित्रपटामध्ये आलियाची मुख्य भूमिका आहे, पण आता अशी चर्चा आहे की, आलियाची या चित्रपटात जास्त भूमिका नाही.

राजामौली यांच्या चित्रपटात काम करण्याचे आलियाचे होते स्वप्न
हाती आलेल्या माहितीनुसार, आलियाने १० दिवस या चित्रपटाच्या शूटिंगसाठी उपस्थित राहिली होती. माध्यमांतील वृत्तांनुसार, आलिया १५ मिनिटांसाठी स्क्रीनवर दिसते. आलियाने रामा राजू या भूमिकेमध्ये दिसणाऱ्या राम चरणची पत्नी अल्लुरी सीताची भूमिका साकारणार आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांची मुलगी आलिया भट्ट राजमौली यांची खूप मोठी फॅन असून तिला त्यांच्या चित्रपटात काम करायचं होतं. त्यामुळे जेव्हा ‘आरआरआर’ चित्रपटाची ऑफर येताच तिने लगेच या चित्रपटासाठी होकार कळवला. या चित्रपटात छोटीशी भूमिका का असेना, पण तिने या चित्रपटासाठी चांगलेच मानधन आकारले आहे.

आलियाने या चित्रपटासाठी १ किंवा २ नव्हे, तर ६ कोटी रुपयांची मागणी केली आहे. टॉलिवूडमध्ये कोणत्याही अभिनेत्रीला मुख्य भूमिकेसाठी देखील एवढी देणगी मिळत नाही, पण आलिया बॉलिवूडमधील सुपरहिट व लोकप्रिय अभिनेत्री असल्याने ‘आरआरआर’च्या टीमने तिची ही मागणी पूर्ण केली आहे. या चित्रपटात बॉलिवूडमधील ‘सिंघम’ या प्रसिद्ध चित्रपटातील अजय देवगणही मुख्य भूमिकेमध्ये दिसत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘फिट ऍंड फाईन’ दिसणारे अनिल कपूर ‘या’ आजाराने आहेत त्रस्त, व्हिडिओ शेअर करत स्वत: केला खुलासा

-लाल बिकिनी घालून बीचवर ‘Chill’ करताना दिसली दिशा पटानी, बोल्ड फोटोला मिळतेय चाहत्यांची पसंती

-जेव्हा सुंदर ड्रेस अचानक खिसकला खाली, भर इव्हेंटमध्ये ‘Oops Moment’ची शिकार झाली मलायका अरोरा

हे देखील वाचा