Sunday, June 23, 2024

‘फिट ऍंड फाईन’ दिसणारे अनिल कपूर ‘या’ आजाराने आहेत त्रस्त, व्हिडिओ शेअर करत स्वत: केला खुलासा

बॉलिवूडचे झक्कास अभिनेता अनिल कपूर त्यांच्या फिटनेस आणि अभिनयासाठी चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. आजच्या काळातही अनिल कपूर चित्रपटांमध्ये इतकी उत्तम व्यक्तिरेखा साकारत आहेत की, प्रत्येकजण त्यांच्यासाठी वेडा आहे. सोशल मीडियावरही ते त्यांच्या फोटोंमुळे चर्चेत असतात. अनिल सध्या जर्मनीत आहेत आणि तिथून त्यांनी स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. पण या व्हिडिओसोबत लिहिलेल्या कॅप्शनने त्यांच्या चाहत्यांना चिंतेत पाडले आहे.

खरं तर, अनिल जर्मनीमध्ये एका जुन्या आजारावर उपचार घेत आहेत आणि शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितले की, आज त्यांच्या उपचाराचा शेवटचा दिवस आहे. अचानक अनिलच्या आजाराबद्दल आणि शस्त्रक्रियेबद्दल ऐकून चाहते खूपच आश्चर्यचकित झाले आहेत आणि त्यांना अनेक प्रश्न विचारत आहेत. (anil kapoor share video from germany told about his treatment fans showed concerned)

अनिल कपूरने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते काळ्या रंगाचा लांब कोट आणि काळी टोपी घालून जर्मनीच्या रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी लिहिले की, “परफेक्ट वॉक इन स्नो, जर्मनीत शेवटचा दिवस, शेवटच्या दिवशी मी माझ्या उपचारांसाठी डॉ. मुलर यांना भेटणार आहे. त्यांच्या कामाबद्दल मी त्यांचे आभार मानतो.” व्हिडिओच्या बॅकग्राउंडमध्ये ‘फिर से उड चला’ गाणे वाजत असून, अनिल बर्फाळ वाऱ्यात चालताना दिसत आहेत. यावर प्रतिक्रिया देत, सोनम कपूरची मैत्रिण आणि नीना गुप्ताची मुलगी मसाबा हिने त्यांना ‘ऑल द बेस्ट’ म्हटले आहे.

दुसरीकडे, अनिल कपूरच्या उपचाराबद्दल ऐकल्यानंतर अनेक चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. एकाने विचारले, “काय झाले तुम्हाला?” तर दुसऱ्याने लिहिले, “सर, गेल्या वर्षी तुम्ही म्हणाला होता की डॉ. मुलरने तुम्हाला पूर्णपणे बरे केले आहे, मला आशा आहे की तुम्ही लवकर बरे व्हाल.”

अनिल कपूरने गेल्या वर्षी त्यांच्या एका पोस्टमध्ये सांगितले होते की, ते अकिलीस टेंडनच्या समस्येने त्रस्त आहेत. शस्त्रक्रियेशिवाय ते बरे होणार नाहीत, असे जगभरातील डॉक्टरांनी सांगितले होते. परंतु डॉ. मुलर यांनी आपल्या जादूई स्पर्शाने त्यांना शस्त्रक्रियेशिवाय बरे केले. पण आता पुन्हा अनिल यांना उपचार घेताना पाहून चाहते चिंतेत पडलेले पहायला मिळाले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अर्रर्रर्र! कॅटरिना कैफ आणि विकी कौशल करणार नाही लग्न? नातेवाईकाने केला मोठा खुलासा

-अश्लील चित्रपट प्रकरणात पुन्हा वाढल्या राज कुंद्राच्या अडचणी, न्यायालयाकडून फेटाळण्यात आला अटकपूर्व जामीन

-Bigg Boss 15; जय भानुशाली झाला शोमधून आऊट, तर नेहा भसीन आणि विशाल कोटियानही झाले बेघर

हे देखील वाचा