Saturday, January 28, 2023

अलका कुबल यांच्या मुली देखील आहेत सौंदर्यवती, अभिनय सोडून ‘या’ क्षेत्रात आहे कार्यरत

चित्रपटसृष्टीमधील कलाकार जसे लोकप्रिय असतात तेवढेच लोकप्रिय त्यांची मुले देखील असतात. अनेक कलाकारांची मुले त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनय क्षेत्रात येतात. पण काही कलाकार मात्र वेगळे मार्ग निवडून त्यांचे करिअर निवडले. दिसायला देखील अगदी सुंदर असूनही त्यांनी या ग्लॅमर क्षेत्रात काम न करता त्यांनी वेगळे करिअर निवडले. असेच मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री अलका कुबल यांच्या मुलींनी देखील वेगळे करिअर निवडले.

अलका कुबल आणि समीर आठल्ये यांच्याशी विवाह झाला आहे. त्यांचा प्रेमविवाह झाला आहे. त्यांना दोन मुली आहेत. एकीचे नाव ईशानी आणि दुसरीचे नाव कस्तुरी आहे. अलका कुबल यांनी अभिनय क्षेत्रात येतील असे अनेकांना वाटले होते. परंतु त्यांनी त्या दोघीनींही वेगळा रस्ता निवडला. त्यांच्या या दोन्ही मुली दिसायलाही खूप सुंदर आहेत. (actress alka kubal daughter’s photos, her daughter is pilot)

अलका कुबल यांची मोठी मुलगी पायलट आहे. ती वयाच्या २३ व्या वर्षी पायलट बनली आहे. लहान असल्यापासूनच ईशानीला पायलट व्हायचे होते आणि तिने तिचे हे स्वप्न पूर्ण केले. नुकतेच काही दिवसांपूर्वी तिचे लग्न झाले. तिचे निशांत वालियासोबत लग्न केले आहे. तो मूळचा दिल्लीतील राहणार आहे. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

अलका कुबल यांनी ‘सोबती’, ‘लेक चालली सासरला’, ‘वहिनीची माया’, ‘तुझ्यावाचून करमेना’, ‘मधुचंद्राची रात्र’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’, ‘शुभ बोल नाऱ्या’, ‘लपवा छपवी’, ‘येडा की खुळा’, ‘जखमी कुंकू’, ‘शिर्डी साईबाबा’, ‘ओवाळणी’, ‘आई तुझा आशिर्वाद’, ‘अग्नीपरीक्षा’, ‘सुर राहू दे’, ‘ते दोन दिवस’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. यासोबत त्यांनी ‘नटसम्राट’, ‘संध्याछाया’, ‘मी मालक या देहाचा’, ‘वट सावित्री’ यांसारख्या नाटकात काम करून त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचा ‘माहेरची साडी’ हा चित्रपट देखील खूप गाजला होता. या चित्रपटाने त्यांची खास ओळख निर्माण करून दिली. त्यानंतर त्यांनी बऱ्याच चित्रपटात काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

हेही वाचा- घरच्यांचा विरोध न स्वीकारता केले होते हट्टाने लग्न, ‘असा’ आहे अलका कुबल यांचा जीवनप्रवास
ब्लॉकबस्टर ‘अशी ही बनवा बनवी’ चित्रपटाला 34 वर्षे पूर्ण, पाहा अजरामर कलाकृतीची स्पेशल स्टोरी
सपना चौधरीला बघताच महिलांनी चक्क ट्रकमध्येच धरला ठेका, डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय राडा

 

हे देखील वाचा