Friday, February 3, 2023

सपना चौधरीला बघताच महिलांनी चक्क ट्रकमध्येच धरला ठेका, डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय राडा

सपना चौधरीच्या डान्सने लाखो लोकांना वेड लावले आहे. तिचा डान्स आणि सुंदर एक्सप्रेशन्स चाहत्यांना घायाळ करतात. ‘बिग बॉस’नंतर ती केवळ हरियाणवी डान्स इंडस्ट्रीतच नाही, तर भारतीय टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्येही एक प्रसिद्ध नाव बनली आहे. सपना सोशल मीडियावर सक्रिय असून कायम चाहत्यांच्या संपर्कात राहते. तिची लोकप्रियता केवळ हरियाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्लीतच नाही, तर यूपी, बिहार, झारखंड, पश्चिम बंगालसह देशातील अनेक भागात आहेत. या दरम्यान, सपना चौधरीचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सपना चौधरीचा थिरकली या गाण्यावर
सपना चौधरी (Sapna Choudhary) हिने स्वतःचा हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ती पांढरा टिशर्ट घालून हरजीत दिवाना आणि नोनू राणा यांचे ‘लव्ह यू गोरी रे’ या गाण्यावर कारमध्ये डान्स करत आहे. नुकतेच रिलीज झालेले हे हरियाणवी गाणे तरुणांच्या प्रचंड पसंतीस उतरलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sapna Choudhary (@itssapnachoudhary)

सपनाने चाहत्यांचे मानले आभार
व्हिडिओ शेअर करताना सपना चौधरीने कॅप्शनमध्ये लिहिले, “आनंदी होती, आनंदी आहे, आनंदी राहणार अभिमानाने सांगते. देसी होती, देसी आहे, देसी राहणार अभिमानाने सांगते. गाण्याला भरभरून प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद.” दुसरीकडे, सपनाच्या हावभावावरून स्पष्ट होते की, ती या क्षणाचा मनापासून आनंद घेत आहे. या व्हिडिओमध्ये सपनाच्या कारसमोर एक ट्रक दिसत आहे, ज्यामध्ये काही महिला बसल्या आहेत.

सपनाला पाहून हरियाणवी महिलांचा डान्स
या महिलांनी हरियाणवी पोशाख घातलेला असून लांब पदर ओढलेला आहे. मात्र, सपना चौधरीची गाडी जशी ट्रकजवळ जाते त्यांना पाहून महिला खुश होतात आणि ट्रकमध्येच नाचू लागतात. सपनाचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. चाहते व्हिडीओवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
पॅपराजींनी राजू यांच्या निधनावर तापसीला विचारला प्रश्न; भडकलेली अभिनेत्री म्हणाली, ‘बाजूला व्हा रे…’
‘नेहा कक्करला 8 वर्षांसाठी तुरुंगात डांबा’, गायिका का होतेय ट्रोल? कारण घ्या जाणून
पत्रकार विचारत होता प्रश्न, तेवढ्यात अचानक रागाने ओरडला सनी देओल; उपस्थितांमध्ये पसरली भयान शांतता

हे देखील वाचा