Wednesday, June 26, 2024

मोठी मुलगी पायलट तर धाकट्या मुलीचीही कौतुकास्पद कामगिरी; अलकाजी फोटो शेअर करत म्हणाल्या,…

गेल्या अनेक वर्षापसून एक उत्कृष्ट अभिनेत्री आणि आदर्श सुन म्हणून प्रेक्षकांच्या मनाव राज्य करणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री म्हणजेच अलका कुबल यांनी मराठी सिनेसृष्टीमध्ये मोलाचं स्थान निर्माण केलं आहे. त्या अभिनया सोबतच सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात. त्यांना दोन मुली आहेत मात्र, त्यांनी अभिनय क्षेत्राला न निवडता वेगळ्याच क्षेत्रामध्ये करिअर घडवलं आहे. त्यांची मोठी मुलगी पायलट आहे तर धाकट्या मुलीनेही कौतुकास्पद कामगिरी केली आहे. ज्यामुळे अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

‘माहेरची साडी’, ‘लेक चालली सासरला’, ‘वहिनीची माया’ सारख्या अनेक गाजणाऱ्या चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली आहे. त्याशिवाय सोशल मिडियावरही अलका कुबल (Alka Kubal) यांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. त्या सतत फोटो शेअर करत त्यांच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या महत्वाच्या गोष्टी आपल्या चाहत्यांना सांगत असतात. काही वर्षापूर्वीच त्यांची मोठी मुलगी ईशानी पायलट झाली आणि आता वैमिनिक म्हणुन कार्यरत आहे. अशातच त्यांची धकटी मुलगी कस्तुरीनेही मोठी कामगिरी केली आहे.

अभिनेत्री अलका कुबल यांची धाकटी मुलगी कस्तुरी परदेशात एमबीबीएस ची पदवी घेत होती तिला डर्मिटोलॉजिस्ट बनायचं आहे. आता त्यांच्या मुलीला डॉक्टराची पदवी प्राप्त झाली आहे ज्यामुळे त्यांनी आपल्या सोशल मीडियावर कस्तुरीचा फोटो शेअर करत तिचं अभिनंदन केलं आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “कस्तुरीने पहिल्याच प्रयत्नात FMGE परवाना परीक्षा यशस्वीपणे पास केली. आज पासून Dr. Kasturee Athalye. आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतो. तुला खूप शुभेच्छा.”

 

View this post on Instagram

 

अलकाजींनी शेअर केलेल्या पोस्टवर चात्यांनीदेखिल शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. त्याशिवाय सोशल मीडियावर त्यांच्या मुलीचा फोटो तुफान व्हायरल होत आहेत. त्यासोबतच इंडस्ट्रीमधील कलाकारांनीही कस्तुरीचं कौतुक केलं आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
‘माझे स्वप्न अपूर्ण राहिले’, लता दीदींबद्दल बोलताना ‘हा’ चित्रपट निर्माता भावूक
लता दीदींना होती महागडे दागिने अन् आलिशान गाड्यांची आवड; मागे ठेवलीये 350 कोटींहून अधिकची संपत्ती, ज्याचे वारस…

हे देखील वाचा