Thursday, September 28, 2023

अमृता खानविलकरच्या ‘त्या’ डान्स व्हिडिओने लावले सर्वांनाच वेड! चाहत्यांसह कलाकारही झाले फिदा

मराठीसोबतच हिंदीमध्ये देखील आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारी प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर होय. अमृताने अभिनयासोबतच तिच्या डान्सने, सौंदर्याने आणि तिच्या फिटनेसने सर्वांनाचे लक्ष वेधून घेते. तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. मराठीमध्ये तर अमृता आघाडीची अभिनेत्री असून, तिने अनेक उत्तम मराठी चित्रपटांमध्ये देखीस चांगले काम केले आहे. हिंदी मनोरंजनविश्वात देखील अमृताने तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट ‘चंद्रमुखी’ने बाॅक्स ऑफिसवर खूप गाजला. या चित्रपटातील अभिनेत्री अमृताने (amrita khanwilkar) केलेल्या लावणीला लोकांनी डोक्यावर घेतले होते. अमृता सोशल मीडियावर सक्रिय असेत. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असेत. तिच्या पोस्टवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत असतात. या दरम्यान अमृताने एक नवा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अमृता कथक नृत्या करताना दिसत आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

व्हिडिओ शेअर करताना अमृताने लिहिले की, “आयुष्यात अशा संधी मिळाल्या की खूप छान वाटत. कधी कधी तो आनंद शब्दात मांडण कठीण होत. मी माझ्या आयुष्यात पहिले कथक नृत्य ‘नॅशनल सेन्टर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’मध्ये सादर केले आहे. त्यावेळी मला 75 नृत्यागणांनी साथ दिली. पियुषराज आणि शुभदा यांचे या नव्या प्रवासासाठी मनापासून आभार…माझ्या गुरुंनी आठवडाभर शिकवण दिली. त्यामुळे मी खरंच भारावून गेले आहे. मला समजून घेतल्याबद्दल तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद…हा नक्कीच माझ्या नृत्य विश्वातील नवा शुभारंभ होता.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

अमृताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच धूमाकुळ घालत आहे. या व्हिडिओवर तिच्या चाहत्यांनी लाइक आणि कमेंटचा वर्षाव केला आहेत. तिच्या या व्हिडिओवर मंजिरी ओक, स्वप्नील जोशी, नंदिता पाटकर यांनी देखील प्रतिक्रिया देऊन तिचे कौतुक केले आहे. (Actress Amrita Khanwilkar’s dance at ‘National Center of Performing Arts’ goes viral)

अधिक वाचा- 
जांभळ्या साडीमध्ये शिल्पाचं घायाळ करणारं सौंदर्य
‘बायकोने कितीही काजू-बदाम खाल्ले…’ रितेश देशमुखने शेअर केला व्हिडीओ ; युजर म्हणाले, ‘तू वहिनीला…’

हे देखील वाचा