शाहिद कपूरसोबत (Shahid Kapoor) ‘विवाह‘ या चित्रपटात काम केल्यानंतर, अमृता राव (Amrita Rao) चांगलीच प्रसिद्धीच्या झोतात आली होती. तिच्या या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. मात्र इतर लोकांप्रमाणे अमृता रावच्या आयुष्यातही अनेक चढउतार आले. अलीकडेच तिने तिच्या आई होण्याच्या प्रवासाविषयी सांगितले, जे ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले. अमृता राव आणि आरजे अनमोलने 2014मध्ये लग्नगाठ बांधली.
अलीकडेच अभिनेत्री अमृता राव आणि तिच्या पतीने पालक होण्याच्या त्यांच्या संघर्षाबद्दल उघड केले, जो २०१६ मध्ये सुरू झाला आणि चार वर्षे चालूच राहिला. त्यांनी त्यांच्या यू ट्यूब चॅनेल ‘कपल ऑफ थिंग्ज’ वर एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये अमृता आणि अनमोल यांनी सरोगसी, IUI, IVF, होमिओपॅथी आणि आयुर्वेद यासह गर्भवती होण्यासाठी विविध पद्धती वापरल्याचा खुलासा केला आहे. (actress amrita rao shares her pregnancy struggle)
व्हिडिओमध्ये अमृताने सांगितले की, ती तीन वर्षे स्त्रीरोगतज्ज्ञांच्या क्लिनिकमध्ये फेऱ्या मारत होती. ती म्हणाली की, अगोदर त्यांना आययूआय (IUI) ट्रीटमेंटचा सल्ला देण्यात आला होता, परंतु त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. अमृता अनमोलला चिडवत म्हणते की, “तो बाप होण्यासाठी खूप आतुर होता.” यावर अनमोलने उत्तर दिले की, “मी प्रत्येक गोष्टीत वेगवान माणूस आहे.”
पुढे ते सांगतात की, “यानंतर डॉक्टरांनी आम्हाला सरोगसी उपचारासाठी सुचवले. याला होकार देऊन, सरोगेट मदर आम्हाला केव्हा गोड बातमी देईल याची आम्ही उत्सुकतेने वाट पाहत होतो. मग एक दिवस डॉक्टरांनी फोन केला आणि सांगितले की, एक गोड बातमी आहे आणि ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. परंतु काही वेळाने डॉक्टरांनी फोन केला आणि सांगितले की आम्ही आमचे मूल गमावले आहे. सरोगसी अयशस्वी झाली आणि हे ऐकून आम्हा दोघांचेही मन तुटले. त्यानंतर आम्ही दोघेही काही काळ काहीच करणार नाही, असे ठरवले.”
अभिनेत्री पुढे म्हणाली, “यानंतर डॉक्टरांनी आम्हाला आयव्हीएफ करून पाहण्यास सांगितले. सुरुवातीला मी या गोष्टीसाठी फारशी तयार नव्हते, पण अनमोलला वाटले की याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही आणि आपण हा प्रयत्नही केला पाहिजे. आम्ही हाही प्रयत्न केला, पण निकाल तसाच आला आणि मग आमच्या हातून आनंद पुन्हा निघून गेला.”
आपली व्यथा मांडत अभिनेत्री सांगते की, “त्यानंतर आम्ही सर्व प्रयत्न केले. मंदिरात गेलो, नवस मागितले आणि होमिओपॅथी देखील करून पाहिली, पण काहीही झाले नाही. मग आम्ही 2020च्या जानेवारीमध्ये सुट्टीचा प्लॅन बनवला आणि सामान्य जीवन सुरू केले. त्यानंतर अचानक एक दिवस आम्हाला गोड बातमी मिळाली. काहीही कामी आले नाही, पण देवाच्या आशीर्वादाने 11 मार्च 2020रोजी मला कळले की मी गरोदर आहे.
साल 2020मध्ये अमृता आणि आरजे अनमोल पालक बनले होते. 1 नोव्हेंबरला अमृताने वीर या गोंडस मुलाला जन्म दिला होता. अमृताने बॉलिवूडमधील अनेक हिट चित्रपटात काम केले आहे. लग्नानंतर तिने चित्रपटातून ब्रेक घेतला. काही दिवसांपूर्वी तिने ‘ठाकरे’ चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले होते.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कुणीतरी येणार गं! अभिनेत्री स्वरा भास्करने दिली गुडन्यूज; पोस्ट शेअर करत म्हणाली…
प्रतीक्षा संपली! भाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित ‘टीडीएम’ चित्रपट ‘या’ दिवशी येणार चाहत्यांच्या भेटीला