दिग्दर्शक करण जोहर याने त्याच्या सेलिब्रिटी चॅट शो ‘कॉफी विथ करण सीझन 7‘ मध्ये लक्षात आणून दिले होते की, त्याचे ‘स्टूडेंट’ अभिनेत्री अनन्या पांडे आणि प्रसिद्ध अभिनेता आदित्य रॉय कपूर यांच्यामध्ये काही खिचडी शिजत आहे. मात्र, करणच्या प्रश्नावर अभिनेत्रीने चाेख प्रत्युत्तर उत्तर देत काही गाेष्टी टाळण्याचा प्रयत्न केला. असे म्हटले जात आहे की, हे दोन सेलिब्रिटी एकमेकांना डेट करत आहेत आणि आता हे प्रकरण अजून चर्चेत आलं, जेव्हा दोघे दिवाळी पार्टीत एकत्र वेळ घालवताना दिसले. रमेश तौरानीच्या दिवाळी पार्टीतून समोर आलेल्या फोटोमध्ये दोघेही बाकीच्यांंन पासून दूर वेगळे बोलतांना दिसले.
हे फोटो समोर आल्यानंतर आता पुन्हा एकदा दोघांच्या डेटींगच्या अफवा जोरात रंगत असल्याचं दिसत आहे. गुरुवारी (दि.20 ऑक्टाेबर)ला मनीष मल्होत्रा (manish malhotra) याने दिवाळी पार्टीचं आयोजन केलं होतं, ज्यामध्ये अनेक सेलिब्रिटी पोहोचले होते. विशेष म्हणजे या पार्टीत अनन्या (ananya panday) आणि आदित्य (aditya roy kapur) पोहोचला होता, जवळपास ते दाेघेही एकाच वेळी आले हाेते. पार्टीत पोहोचल्यावर दोघांनी एकत्र फाेटाेसाठी पाेजही दिल्यात.
View this post on Instagram
इतकेच नाही, तर दोघांनीही यावेळी एकाच रंगाचे पोशाख परिधान केले होते. मात्र, पार्टीत पोहोचलेल्या सर्व स्टार्सनी जवळपास एकाच रंगाचे कपडे परिधान केले होते. अनन्या आणि आदित्यचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर प्रत्येकजण एकच प्रश्न विचारत आहे की, “हे दाेघेही रिलेशनशिपमध्ये असल्याचा यांचा ईशारा तर नाही?” याव्यतिरिक्त अनेकांनी व्हिडिओवर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.
व्हिडिओवर कमेंट करताना अनेक युजर्सनी आनंद व्यक्त केला, तर अनेकांनी नाराजीही व्यक्त केली आहे. अनन्या आणि आदित्यच्या व्हिडिओवर कमेंट करत काही युजर्सनी अभिनेत्रीला ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला. एकाने कमेंट करत लिहिले की, “नाही… ही मुलगी आदित्य रॉय कपूरची गर्लफ्रेंड असू शकत नाही.” तर दुसर्याने कमेंट करत लिहिले की, “आदित्यने ही पोज का दिली.”
अनन्या पांडेच्या कारकीर्द विषयी बाेलायचे झाले तर, अनन्याने निवडक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती तिच्या चित्रपटांसाठी खूप मेहनत करते, पण दुर्दैवाने तिचे चित्रपट बाॅक्स ऑफिसवर विशेष चालत नाही. अनन्या ‘लायगर’ चित्रपटापुर्वी ‘गेहराईयां’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिच्या व्यतिरिक्त दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदीही महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. याशिवाय तिचा ‘खो गये हम कहाँ’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘माय – बापानं काही शिकवलं नाही…’, अर्चना गाैतम अन् प्रियंका चाैधरीचे जाेरदार भांडण
‘ढोंगीपणालाही मर्यादा असते’, साजिद खानच्या धूम्रपानावर संतापले युजर्स