बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक साजिद खान सध्या ‘बिग बॉस 16‘ मध्ये दिसत आहे. या शोमध्ये त्याची एन्ट्री झाल्यापासून सोशल मीडिया युजर्स त्याला प्रचंड ट्रोल करत आहेत. यादरम्यान, नुकताच बिग बॉसच्या घरातील त्याचा असा एक फोटो व्हायरल झाला आहे, ज्यामुळे तो पुन्हा एकदा लोकांच्या निशाण्यावर आला आहे.
व्हायरल झालेला फोटो साेमवार (14 नाेव्हेंबर) एपिसोडचा आहे, ज्यामध्ये साजिद खान (Sajid Khan) खुलेआम धूम्रपान करताना दिसत आहे. साजिद बागेच्या परिसरात बसून आरामात सिगारेटचा धूर फुंकत असल्याचे फाेटाेत दिसत आहे. हा फोटो समोर आल्यानंतर, नियम तोडल्याबद्दल नेटिझन्स त्याच्यावर संतापले आहेत आणि ट्विटरवर आपला राग व्यक्त करत आहेत.
#SajidKhan is breaking all the rules time & again lekin #BiggBossTelugu6 apne damad ko punishment de hi nahi sakte because Big B is scared of him #Biggboss16
HBD BBQUEEN SUMBUL pic.twitter.com/NMtY3Ie9I2— Dimple Yadav (@AjitDoval3) November 15, 2022
आपली नाराजी व्यक्त करत एका यूजरने लिहिले की, “साजिद खान सतत बिग बाॅसच्या घराचे नियम तोडत आहे पण बिग बॉस त्याला शिक्षा करत नाही कारण ते त्याला घाबरत आहे.” आणखी एका युजरने ट्विट करत लिहिले की, “साजिद खान पुन्हा एकदा घरात खुलेआम सिगारेट ओढत होता आणि त्यानंतर त्याला घराचा कॅप्टन बनवण्यात आले. भोंदूगिरीला सीमा नाही, बिग बॉस.” याशिवाय इतर अनेक युजर्स कमेंट्सद्वारे आपला राग व्यक्त करत आहेत.
Sajid was smoking openly again today, and then he went in to become the captain!! waaaah! Hypocrisy ki bhi koi seema hoti hai Bigg Boss! #Sajidkhan #bb16 #BiggBoss #Biggboss16 #SajidKhan pic.twitter.com/DltytwQ51o
— Mahira ???? (@mahi_khan4) November 15, 2022
साजिद खानवर ‘मीटू’ अंतर्गत आतापर्यंत अनेक मुलींनी आरोप केले आहेत. या आरोपांमुळे बिग बॉस शोवर बरीच टीका होत आहे. एवढ्या गंभीर प्रकरणातील आरोपीला या शोमध्ये स्थान कसे मिळाले, असे लोकांचे म्हणणे आहे. साजिद खानच्या वर्क फ्रंटबद्दल बाेलायचे झाले तर, साजिदने आतापर्यंत अनेक मोठे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. त्यात ‘हाऊसफुल’, ‘हाउसफुल 2’ यासारख्या दमदार चित्रपटांचा समावेश आहे. साजिद ‘हाऊसफुल 4’चे दिग्दर्शनही करत होता पण मीटूच्या आरोपानंतर त्याला चित्रपटातून बाहेर काढण्यात आले. (sajid khan slammed by netizens for smoking in big boss house)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रेयसीचे 35 तुकडे करणाऱ्या आफताबवर स्वराचा राग आला उफाळून; ट्विट करत म्हणाली…
प्रतीक्षा संपली! आलियाने आई झाल्यानंतर शेअर केला पहिला फाेटाे; चाहते म्हणाले, ‘बाळाचा फाेटाे…’