Tuesday, May 21, 2024

‘माय – बापानं काही शिकवलं नाही…’, अर्चना गाैतम अन् प्रियंका चाैधरीचे जाेरदार भांडण

छाेट्या पडद्यावरील वादग्रस्त शाे ‘बिग बॉस 16‘ जसजसा पुढे जात आहे, तसतसे या शोमधील स्पर्धकांमध्ये भांडणही होत आहे. हा शो आता अशा टप्प्यावर पोहोचला आहे, जिथे मित्रही भांडताना दिसत आहेत. ‘बिग बॉस’च्या घरात अर्चना गौतम हिची एंट्री झाली असून अर्चनाच्या येण्याने प्रियांका चौधरी सर्वाधिक खूश होती. मात्र, आता दोघांमध्येच लढाई पाहायला मिळत आहे. मेकर्सनी सोशल मीडियावर ‘बिग बॉस’च्या आगामी एपिसोडचा प्रोमो शेअर केला आहे, ज्यामध्ये दोघे किचन परिसरात भांडताना दिसत आहेत.

समोर आलेल्या प्रोमोमध्ये, अर्चना (Archana Gautam) आणि प्रियंका (Priyanka Choudhary) स्वयंपाकघरातील कामामुळे भांडताना दिसत आहे. अर्चना प्रियांकाला सांगते की, “तू फक्त एक कोबी आणि बटाटे कापत आहे. आज मी तुला चपाती बनवायला मदत करते. पण त्या बदल्यात तु स्वयंपाकघरातील संपूर्ण रॅक साफ कर.” पण प्रियंका या कामाला साफ नकार देते आणि म्हणते, “मी कोणाच्या सांगण्यावरून काहीही करणार नाही.” यामुळे अर्चना प्रियांकावर चिडते.

इतकंच नाही तर, अर्चना गौतम आणि प्रियंका चौधरी यांच्यात वाद इतका वाढताे की, दोघेही एकमेकांच्या आई-वडिलांना मधे आणतात. अर्चना प्रियांकाला सांगते की, “ती बिग बॉसचा स्वयंपाक करून उपकार करत नाही आणि तिच्या पालकांनी तिला स्वयंपाक करायला शिकवले नाही.” हे ऐकून प्रियांका स्वत:वरचा ताबा गमावून बसते आणि अर्चनाला सांगते की, “तिच्या पालकांनवर जाण्याची  गरज नाही.” दोघांच्या भांडणाचा हा प्रोमो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शेवटच्या दिवसापर्यंत एकत्र उभे असलेल्या दोघी आता एकाच शोमध्ये भांडताना दिसल्याने प्रेक्षकांना आश्चर्य वाटत आहे.

या आठवड्यात साजिद खान बिग बाॅस घराचा कॅप्टन बनला आहे आणि कॅप्टन बनण्यासोबतच त्याला घराचा नवा राजा देखील घोषित करण्यात आलं आहे. (bigg boss 16 archana gautam and priyanka choudhary fight in actor salman khan show)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘श्रद्धासारख्या अजून किती पोरींचा बाळी घेणार…’; म्हणत, केतकी चितळेनी व्यक्त केला संताप
‘आक्कल दाढ काढली म्हणून आक्कल पण…;’म्हणत, धनश्री काडगावकरने शेअर केला व्हिडिओ

हे देखील वाचा