ओटीटीवर नेहमी चर्चेत असणारा करण जोहर याचा शो ‘कॉफी विद करण’चा नवीन भाग खूपच चर्चेत असतो. या शोमध्ये नुकत्याच झालेल्या 12व्या भागामध्ये भावना पांडे, महिप कपूर आणि गौरी खान यांची एन्ट्री झाली आहे. यांच्यासोबत मस्ती करत असताना करण अनन्याबद्दल तिची आई भावनाला असा प्रश्न विचारतो की, तीदेखील हैराण होते. चला तर जाणून घेऊया की, करणने अनन्याबद्दल असा काय प्रश्न विचारला होता?
‘कॉफी विद करण’ (Koffee With Karan) या टॉक शोमध्ये पाहुण्या कलाकारांना करण जोहर (Karan Johar) सिनेमापासून ते बेडरूमपर्यंतचे प्रश्न विचारत असतो. तसेच, सेलिब्रिटींकडून सगळी खरी उत्तरे काढून घेण्यात तर करण हुशारंच आहे. त्यामुळे असे काही सेलिब्रिटी आहेत, जे या शोच्या रॅपिड फायर राऊंडला खूपच घाबरतात. या कार्यक्रमाच्या नवीन भागामध्ये एकसोबत प्रसिद्ध कलाकारांसोबत खूपच चांगल्या गप्पा गोष्टी रंगतात आणि करण अचानकच सांगतो की, “अनन्या पांडे (Ananya Panday) एकसोबत दोन दोन मुलांना डेट करते.” त्यावेळी भावना पांडे (Bhavana Pandey) आश्चर्यचकित होते आणि अनन्याची बाजू घेण्याचा प्रयत्न करते. मात्र, करण तिचे हे प्रयत्न चालू देत नाही. याच्या आधी अनन्या पांडेचं आणि ईशान खट्टर (Ishaan Khatter) यांचे ब्रेकअप झाले होते आणि हे दोघेही करणच्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये येऊन गेले आहेत.
View this post on Instagram
गौरी खान आर्यनला काय सल्ला देते?
कॉफी विद करणच्या कार्यक्रमामध्ये गौरी खानला रॅपिड फायर राउंडमध्ये तिच्या मुलांविषयी काही प्रशन विचारले जातात, आणि त्यावर ती उत्तर देत खूपच चांगले सल्लेही देते. तिला करण प्रशन विचारतो की, “तुझ्या मुलीला तू कोणता डेटिंगचा सल्ला देशील?” तेव्हा गौरी खानला अनन्याचे कृत्य आठवते आणि उत्तर देत असताना सांगते की, “एकसोबत दोन मुलांना डेट करू नकोस.” यावर करण म्हणतो की, “हा खूपच चांगला सल्ला होता.” गौरी आर्यन खानलाही सल्ला देत सांगते की, “बाळा लग्नाच्या आधी जेवढ्या मुलींना डेट करायचे आहे, तेवढ्या मुलींना डेट कर, पण लग्नानंतर सगळंच बंद.”
करणने सांगितले अनन्याचे गुपित
करण जोहर भावना पांडेकडे बघत तिला विचारतो की, “हे खरे आहे का? अनन्याने एकसोबत दोन मुलांना डेट केले आहे?” यावर ती आश्चर्याने पाहते आणि म्हणते की, “तिने असे केले आहे?” यावर करण म्हणतो की, “मला वाटत आहे की, ती दोन लोकामध्ये गोंधळली होती.” लगेच भावना सांगते की, “नाही ती दोन्ही मुलांचा विचार करत होती आणि त्यामुळे तिने एकासोबत ब्रेकअप केले.”
अनन्याला आर्यनही आवडतो?
अनन्या करण जोहरच्या कार्यक्रमामध्ये आधी विजय देवरकोंडासोबत आली होती, तेव्हा तिला करणने प्रश्न विचारला होता की, तू ईशानला डेट करत असताना तू विजयलाही डेट करत होती. त्यावर अनन्या उत्तर देत सांगते की, ही फक्त मित्रासारखी डेट होती. मात्र, करण आणि अनन्या यांच्या गोष्टीवरून असे वाटत आहे की, अनन्याला आर्यन खानही आवडत आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘नेहा कक्करला 8 वर्षांसाठी तुरुंगात डांबा’, गायिका का होतेय ट्रोल? कारण घ्या जाणून
पत्रकार विचारत होता प्रश्न, तेवढ्यात अचानक रागाने ओरडला सनी देओल; उपस्थितांमध्ये पसरली भयान शांतता
‘माझ्या गाडीचा ब्रेक फेल केला, विष देऊन मारण्याचाही प्रयत्न झाला…’ अभिनेत्री तनुश्री दत्ताचा खळबळजनक खुलासा