Friday, February 3, 2023

‘माझ्या गाडीचा ब्रेक फेल केला, विष देऊन मारण्याचाही प्रयत्न झाला…’, अभिनेत्री तनुश्री दत्ताचा खळबळजनक खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता (tanushree dutta) सध्या सिनेसृष्टीत फारशी दिसत नसली तरी सोशल मीडियावर मात्र नेहमीच चर्चेत येत असते. तनुश्री दत्ता आणि अभिनेते नाना पाटेकर यांच्यातील वाद चांगलाच रंगला होता. तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर धक्कादायक आरोप केले होते. ज्यामुळे सिनेसृष्टीत चांगलीच खळबळ उडाली होती. आता पुन्हा एकदा तनुश्री तिच्या एका खुलाश्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, बॉलिवूडमध्ये मी टूच्या चळवळूीमुळे तनुश्री दत्ता चांगलीच चर्चेत आली होती. त्यानंतर आता अलिकडेच एका मुलाखतीत तिने धक्कादायक खुलासे केले आहेत.अलीकडेच एका  मुलाखतीत तनुश्री दत्ताने खुलासा केला होता की, “मी उज्जैनमध्ये असताना माझ्या गाडीच्या ब्रेकमध्ये एक-दोन वेळा छेडछाड करण्यात आली होती. माझाही खूप वाईट अपघात झाला. माझी हाडे तुटण्यापासून थोडक्यात बचावली. या अपघाताने मला काही महिने थांबवले होते कारण माझ्या दुखापती पूर्णपणे बरे होण्यास वेळ लागला होता. माझे खूप रक्त वाया गेले होते.”

तिचा मुद्दा पुढे नेत तनुश्रीने असेही शेअर केले की तिला विश्वास आहे की तिला अनेकदा विष देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तनुश्री म्हणाली, “माझी एक मोलकरीण होती, जी माझ्या घरात काम करायची. ती आल्यानंतर मी हळूहळू आजारी पडू लागले. तेव्हाच मला माझ्या पाण्यात काहीतरी मिसळले जात असल्याचा संशय येऊ लागला. या वर्षाच्या सुरुवातीला तनुश्रीने सोशल मीडियावर दावा केला होता की ती चित्रपटांमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र तिचे प्रयत्न हाणून पाडले जात असून तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.”

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा- राजूंना बरं-वाईट म्हणणाऱ्या कॉमेडियनचा नेटकऱ्यांनी केला बाजार, ट्रोलर्सला घाबरत मागितली माफी
पलकच्या बोल्डनेसची झलक! पाहा फोटो गॅलरी
‘लायगर’ फ्लॉपनंतर विजय देवरकोंडा वादात, 7 कोटी बुडवले, मोबाईलही केला बंद?

 

हे देखील वाचा