बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या तिचा आगामी चित्रपट ‘गहराइया’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सोशल मीडियावर नवनवीन फोटोशूट शेअर केल्याने चाहते तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. हा चित्रपट ११ फेब्रुवारीला ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. शकुन बत्रा दिग्दर्शित चित्रपटाचे प्रमोशन करत असताना अनन्याने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा केला आहे.
अनन्या पांडेने व्हॅलेंटाईन वीकच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच प्रपोज डेच्या दिवशी तिच्या मनातील भावनांबद्दल सांगितले. माध्यमांतील वृत्तानुसार, अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्ट शेअर केली आणि चित्रपटाला आधुनिक नातेसंबंधांचा आरसा म्हणून वर्णन केले.
प्रमोशनवेळी अनन्याला (Ananya Panday) विचारण्यात आले की, चित्रपटात दाखवलेल्या गोष्टी तिला कधी जाणवल्या आहेत का? यावर अनन्या पांडे हसली आणि म्हणाली की, “चित्रपटात जे दाखवले आहे तितके नाही पण कुठेतरी या पातळीवर नक्कीच जाणवले आहे.”
अनन्या पांडेने सांगितले की, “मला फसवणूक आणि मन दुखावल्यासारखे वाटले आहे. माझीही फसवणूक झाली पण अशी नाही.” अनन्या पांडेने तिचा किलर लूक शेअर करून केवळ चाहत्यांचीच मने जिंकली नाहीत, तर तिची मैत्रिण शनाया कपूरचेही मन जिंकले. अनन्या पांडेने तिचे सुंदर फोटो शेअर करत लिहिले की, “विश्वास बसत नाही की ‘गहराइया’ (Gehraiyaan) प्रदर्शित होण्यासाठी फक्त ३ दिवस बाकी आहेत.”
अनन्या पांडेने माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, या चित्रपटात तिच्यावर चांगली कामगिरी करण्याचा खूप दबाव होता, कारण तिला तिच्या पात्राला जस्टिफाय करायचे होते. अनन्या पांडेने सांगितले की, “याची सुरुवात भीती आणि दबावाने झाली पण नंतर मला जाणवले की, या प्रक्रियेतून जात असताना मला स्वातंत्र्य मिळत आहे.”
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे आणि नसीरुद्दीन शाह यांचा ‘गहराइया’ ११ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची चाहते बऱ्याच दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत आहेत. शकुन बत्राच्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट प्रेम, लग्न आणि स्वतःची ओळख तसेच नात्यातील विश्वासघात या कथेवर आधारित आहे. चित्रपटाची कथा एका ३० वर्षीय महिलेभोवती फिरते जिला आयुष्यात पुढे जायचे आहे. पण ती तिच्या ६ वर्षांच्या नात्याशी झुंजत आहे.
हेही वाचा :