×

सिद्धांत चतुर्वेदींकडून जॅकेट घेतल्यानंतर ट्रोल झालेल्या अनन्या पांडेची आली त्यावर प्रतिक्रिया

कलाकारांना त्यांच्या वेगवेगळ्या कारणांसाठी, गोष्टींसाठी सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. कलाकरांना ट्रोल करण्याचे प्रमाण खूपच आहे, आणि आजकाल ट्रोलिंग ही खूपच सामान्य गोष्ट झाली असून, रोज विविध कलाकारांना कोणत्या ना कोणत्या लहान सहान बाबींवरून ट्रोल करण्याचे प्रमाण खूप आहे. सध्या सोशल मीडियावर अनन्या पांडेला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात असून, तिला तिच्या कपड्यांवरून ट्रोल केले जात आहे. सध्या दीपिका पादुकोण (Deepika Padukone), अनन्या पांडे (Ananya Pandey) आणि सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) त्यांचा आगामी ‘गेहराइया’ सिनेमाचे मोठ्या जोरात आणि जोशात प्रमोशन करत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनादरम्यान या तिघांचाही अतिशय आकर्षक आणि स्टायलिश अवतार सर्वांना पाहायला मिळाला. यांचे अनेक व्हिडिओ आणि फोटो इंटरनेटवर खूपच व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

याच प्रमोशन दरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला होता, ज्यात ‘गेहराइया’ चित्रपटाच्या प्रमोशनवेळी अनन्या पांडेला थंडीपासून वाचण्यासाठी सिद्धांत चतुर्वेदींने त्याचे जॅकेट दिले होते. यासोबतच तिचा अजून की व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यात दीपिका आणि सिद्धांतसोबत अनन्या देखील अतिशय स्टायलिश लूकमध्ये दिसत आहे. अनन्याला पाहून पॅपराजी म्हणतात, ‘आज थंडी कमी आहे’. यावर ती हसत म्हणते, ‘खरंच आज थंडी कमी आहे.’ आता पुन्हा एकदा अनन्या तिच्या नवीन ड्रेसमुळे ट्रोल होत आहे. सिनेमाच्या प्रमोशनवेळी तिने लाल रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला होता. या ड्रेसमुळे तिला चालत देखील येत नव्हते. त्यांउळे तिला ट्रोल केले जात आहे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

ananya-pandey-trolled

मागच्या आठवड्यातच ‘गेहराइया’ सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला होता. या ट्रेलर लाँचच्यावेळी दीपिकाने सांगितले की, ‘गेहराइया’ हा असा सिनेमा आहे, जो याआधी कधीच बनला नाही. या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर लगेच हा तुफान ट्रेंडिंग झाला आहे. या सिनेमात असलेले दीपिका आणि सिद्धांत यांच्यात असलेले अनेक किसिंग सीन सर्वत्र चर्चेचा विषय ठरले आहे.

हेही वाचा :

सौंदर्याची खाण असलेल्या सोनाली कुलकर्णीचे बोल्ड फोटो समोर, चाहते म्हणतायेत, ‘इथे आग लागली ना राव’

मॉलमध्ये शॉपिंग करायला गेलेल्या अनुष्का शर्माचे चमकले नशीब, ‘अशी’ मिळाली किंग खानसोबत काम करण्याची संधी

‘आमच्या पवानगीशिवाय…’ सिद्धार्थ शुक्लाच्या कुटुंबाने त्याचा चाहत्याने दिले ‘हे’ अनोखे आवाहन

Latest Post