Sunday, September 8, 2024
Home बॉलीवूड अं’मली पदार्थ प्रकरणी एनसीबीच्या चौकशीनंतर अनन्याने पहिल्यांदाच शेअर केली पोस्ट, तुम्ही पाहिली का?

अं’मली पदार्थ प्रकरणी एनसीबीच्या चौकशीनंतर अनन्याने पहिल्यांदाच शेअर केली पोस्ट, तुम्ही पाहिली का?

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेचे नाव गेल्या महिन्यात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या अं’मली पदार्थ प्रकरणात समोर आले होते. आर्यन खानच्या व्हॉट्सॲप चॅटच्या माध्यमातून एनसीबीला तपासात समोर आले की, आर्यन खान मुलगा आणि अनन्या पांडे अं’मली पदार्थाबद्दल बोलत होते. त्यानंतर अनन्या पांडेला एनसीबीने चौकशीसाठी कार्यालयात बोलावले होते. चौकशीनंतर तिने पहिल्यांदाच सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

अनन्याने मंगळवारी (१५ नोव्हेंबर) तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. एनसीबीच्या चौकशीनंतर अनन्या काही काळ सोशल मीडियापासून दूर होती. आता या वादानंतर ती पहिल्यांदाच इंस्टाग्रामवर परतली आहे. तिने तिच्या चाहत्यांसाठी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती कारच्या आत बसून इंद्रधनुष्य कॅप्चर करताना दिसत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की, “थोड्या पावसाशिवाय तुमच्याकडे इंद्रधनुष्य असू शकत नाही. हे पाहा.”

हा व्हिडिओ कुठे शूट करण्यात आला आहे, याबाबत अनन्याने माहिती दिलेली नाही. या सुंदर व्हिडिओमध्ये अनन्याच्या हसऱ्या चेहऱ्यापासून ते कारबाहेरील दूरवरच्या निसर्गात आकाशातील इंद्रधनुष्याच्या दृश्यापर्यंत कॅमेरा कॅप्चर करतो. बाहेर हिरवळ आहे आणि आकाशात एक सुंदर इंद्रधनुष्य उगवला आहे. या व्हिडिओला ६ लाख ९८ हजारांहून अधिक चाहत्यांनी लाईक केले आहे. अनन्याचे चाहते या व्हिडिओवर भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत आणि कमेंटही करत आहेत.

एका युजरने लिहिले की, “अनन्या पांडेला लोकांकडून खूप त्रास दिला जातो, यात तिची चूक नव्हती.” त्याचवेळी, अनेक युजर्स आनंदी आहेत आणि इंस्टाग्रामवर परत येण्यासाठी तिचे स्वागत करत आहेत. मुंबईतील क्रूझवरील अं’मली पदार्थ प्रकरणी चौकशीनंतर अनन्या इंस्टाग्रामपासून पूर्णपणे दूर होती. याआधी ती या प्लॅटफॉर्मवर खूप सक्रिय होती.

अनन्याची आई भावना पांडे यांनीही या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या मुलीच्या या सुंदर व्हिडिओवर तिने हार्ट इमोजी बनवला आहे. चित्रपट निर्माते गुनीत मोंगा आणि अनन्याची मैत्रीण हेलेना अलेसी यांनीही व्हिडिओवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने लिहिले, “चांगल्या आणि वाईट गोष्टी आयुष्याचा भाग आहेत. स्वीकारा चुकीचे शिकण्याची प्रक्रिया आहे, तुम्ही त्यावर मात कराल. जर तुम्ही असे केले, तर तुम्हाला आनंद होईल आणि ही चांगली गोष्ट आहे.”

एनसीबीने अनन्या पांडेची पुरवठादार म्हणून चौकशी केली होती, जी या चॅट्सनुसार कमी प्रमाणात व्यवहार करायची. अनन्या पांडेला एनसीबीने दोनदा चौकशीसाठी कार्यालयात बोलावले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘असा’ जुगाड तुम्ही कधीही पाहिला नसेल! अक्षय कुमारने जॅकलिनचा हेलिकॉप्टरमधील व्हिडिओ केला शेअर

-एकदम झक्कास! अभिनेत्री नीलम गिरीने दुबईच्या रस्त्यावर दाखवले लटके-झटके, व्हिडिओ भन्नाट व्हायरल

-‘मंजिल मंजिल’ चित्रपटाला ३७ वर्षे पूर्ण; डिंपलसोबत काम करण्यास कुणी तयार नसताना सनीने दिली होती साथ

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा