Tuesday, March 17, 2026
Home बॉलीवूड एनसीबीने अनन्या पांडेला बजावले समन्स, केली जाईल तिसऱ्यांदा चौकशी

एनसीबीने अनन्या पांडेला बजावले समन्स, केली जाईल तिसऱ्यांदा चौकशी

मुंबई क्रूझ अं’मली पदार्थ प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन आधीच तुरुंगात आहे, तर अभिनेत्री अनन्या पांडेच्याही या प्रकरणात अडचणी वाढत आहेत. सोमवारी (२५ ऑक्टोबर) एनसीबीने अनन्या पांडेला तिसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावले आहे. शुक्रवारी एजन्सीने अनन्या पांडेची सुमारे चार तास चौकशी केली. याआधी गुरुवारी एनसीबीने अं’मली पदार्थ क्रूझ प्रकरणात अनन्याची दोन तास चौकशी केली होती.

केली जाईल पुन्हा चौकशी
खरं तर, आर्यन खानच्या प्रकरणात व्हॉट्सॲप चॅटमध्ये अनन्या पांडेच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता. त्यानंतर तिच्या घरावर एनसीबीने छापा टाकला आणि ऑफिसला फोन करून तिची चौकशी केली गेली. माध्यमांतील वृत्तानुसार, अनन्याने सांगितले की, तिने कधीही अं’मली पदार्थाचे सेवन केलेले नाही. चौकशीदरम्यान अनन्या पांडे अनेकदा रडली देखील आहे.

बुधवारी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी अनन्याच्या घरावर छापा टाकला आणि त्याच दिवशी तिला बोलावून तिचा जबाब नोंदवला आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी छाप्यादरम्यान तिचा लॅपटॉप आणि फोन जप्त केला आहे. त्यानंतर त्याच संध्याकाळी चार वाजता अनन्या वडील चंकी पांडेसोबत एनसीबी कार्यालयात पोहोचली.

माध्यमांतील वृत्तानुसार, एका व्हॉट्सॲप चॅटमध्ये आर्यनच्या अं’मली पदार्थ डीलिंगची गोष्ट समोर आली होती. ज्यामध्ये अनन्याने लिहिले होते की, ती व्यवस्था करेल. अशा परिस्थितीत जेव्हा अनन्याला विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली की, ती फक्त विनोद करत होती आणि तिला हे माहित नव्हते की, विड हे अं’मली पदार्थ असतात. अनन्याच्या अशा बातम्या समोर आल्यापासून तिला सतत ट्रोल केले जात आहे. सोशल मीडियावर तिच्याबद्दल अनेक मीम्स शेअर केले जात आहेत.

एका नवीन अहवालात दावा करण्यात आला आहे की, एका सेलिब्रिटीचा नोकर कथितपणे अनन्याच्या सांगण्यावरून आर्यन खानला अं’मली पदार्थ पोहोचवतो. माध्यमांतील वृत्तानुसार, एनसीबीने या सेवकाची चौकशी केली आहे, ज्याचे वय २४ वर्षे असल्याचे सांगितले जाते. ही व्यक्ती बॉलिवूडमधील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वाच्या घरी काम करते. असे म्हटले जात आहे की, ही तीच व्यक्ती आहे, जी कथितपणे अनन्याच्या सांगण्यावरून आर्यनला अं’मली पदार्थ पुरवते. एनसीबीने या व्यक्तीला मुंबईच्या मलाड भागातून ताब्यात घेतले आहे. या व्यक्तीने एनसीबीला काय सांगितले आहे, त्याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अं’मली पदार्थ प्रकरणामुळे अनन्याच्या हातातून निसटला मोठा चित्रपट? बिघडणाऱ्या इमेजमुळे होणार नुकसान?

-‘एनसीबीला माझे नाव सांगू नको, म्हणायला गेलाय’, अनन्याच्या घरी बुके घेऊन गेलेल्या ईशानची नेटकऱ्यांनी उडवली टिंगल

-अनन्या पांडेच्या अडचणीत वाढ; जुने चॅट रिट्रिव्ह करण्यासाठी एनसीबीने जप्त केल्या ‘या’ गोष्टी

हे देखील वाचा