सिनेमा किंवा टीव्ही इंडस्ट्रीत काम करणाऱ्या कलाकारांकडे पाहिल्यानंतर प्रत्येकाला वाटते की, त्यांच्याकडे अमाप संपत्ती असते. त्यांना कधीच कोणत्या गोष्टींचा त्रास सहन करावा लागत नाही. मात्र, या फक्त बोलण्याच्या गोष्टी झाल्या. सगळेच कलाकार श्रीमंत नसतात. काहींना इंडस्ट्रीत काम करूनही हवा तसा पैसा मिळत नाही. अशीच एक अभिनेत्री आहे, जी सध्या रुग्णालयात दाखल असून तिच्याकडे उपचारासाठीही पैसे नाहीयेत.
छोट्या पडद्यावरील ‘मेरे साईं’ या कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अनाया सोनी (Anaya Soni) हिची नुकतीच तब्येत बिघडली होती. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जेव्हा अनाया ‘मेरे साईं’च्या सेटवर शूटिंग करत होती, तेव्हा ती अचानक बेशुद्ध झाली. त्यानंतर अनायाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि शूटिंग थांबवण्यात आली. असे म्हटले जात आहे की, अनायाची तब्येत अजूनही ठीक नाहीये.
माध्यमांतील वृत्तांनुसार, अनाया सोनीच्या वडिलांनी डॉक्टरांनुसार सांगितले आहे की, अनायाची एक किडनी खराब झाली आहे. तिची किडनी बदलावी लागेल. अनाया सध्या डायलिसिसवर (Anaya Soni On Dialysis) आहे. अनायाच्या वडिलांनी हेदेखील सांगितले की, त्यांची आर्थिक परिस्थिती ठीक नाहीये. अनाया हिच्या उपचारासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नाहीयेत. अशात अभिनेत्रीच्या वडिलांनी ही चिंता सतावतेय की, तिची किडनी बदलण्यासाठी आणि डायलिसिससाठी पैसे कुठून आणायचे.
View this post on Instagram
अनायाने पोस्ट शेअर करत दिली माहिती
अनाया सोनीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट केली आहे. यामध्ये तिने तिच्या तब्येतीबद्दल सांगितले आहे. अनायाने लिहिले की, “डॉक्टर म्हणत आहेत की, माझी किडनी खराब झाली आहे आणि मला डायलिसिसवर जावे लागेल. माझे क्रिएटिनिन कमी होऊन 15.67 आणि हिमोग्लोबिन 6.7 झाले आहे. स्थिती खूपच गंभीर आहे. सोमवारपासून मी अंधेरी पूर्व भागातील होली स्पीरिट रुग्णालयात मी दाखल आहे. माझ्यासाठी प्रार्थना करा. आयुष्य सोपे नाहीये. मात्र, मी वास्तवात राहून हे सोपे बनवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, ही वेळ येणार होती, हे मला माहिती होते.”
यापूर्वीही तिने मदत मागणारी पोस्ट शेअर केली होती.
View this post on Instagram
अनायाबद्दल बोलायचं झालं, तर ती ‘चकिकन करी लॉ’, ‘द परफेक्ट स्क्रीम’ यांसारख्या सिनेमा आणि शॉर्ट व्हिडिओत झळकलीय. तसेच, तिने ‘नामकरण’, ‘क्राईम पेट्रोल’ आणि ‘अदालत’ यांसारख्या कार्यक्रमातही काम केले आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
फेक फोटोंमुळे चर्चेत आले होते ‘हे’ बॉलिवूड कलाकार, यादीमध्ये आहेत मोठ मोठे अभिनेते
चित्रपटापेक्षाही जास्त लोकप्रियता मिळवणाऱ्या ‘या’ पाच वेबसीरिज, पाहा यादी