Friday, March 31, 2023

चित्रपटापेक्षाही जास्त लोकप्रियता मिळवणाऱ्या ‘या’ पाच वेबसीरिज, पाहा यादी

ओटीटी प्लॅटफॉर्मच्या काळामध्ये वेबसीरिज आणि कंटेंटला चाहत्यांनी डोक्यावर घेतले आहे. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत वेबसीरिज खूपच आवडीने पाहात असतात. सुट्टीच्या दिवशी जर घरी बसून आपल्या आवडीची सीरिज पहायला भेटली तर तो दिवस खूपच चांगला जातो आणि या आनंदाला कुठल्याच गोष्टीचा तोड नसतो. आज आम्ही तुम्हाला अशाच सीरिजबद्दल माहिती देणार आहोत ज्या कॉमेडी, थ्रीलर, सस्पेंन्सनी भरलेल्या असतात ज्यांना पाहून तुमचे आणखीच मनोरंजन होईल.

ब्रोकन बट ब्यटीफुल-
‘ब्रोकन बट ब्युटीफुल'(Broken But Beautiful) ही वेबसीरिज एम एक्स प्लेयर आणि अल्ट बालाजीवर उपलब्ध आहे. आतापर्यत या वेबसीरिजचे तीन सिजन होउन गेले आहेत. या वेबसीरिजचे दिग्दर्शन एकता कपूरने केले असून याचा पहिला सिजन 2018 साली प्रदर्शित केला होता. या भागामध्ये दोन प्रेमिकांचे ब्रेकअप आणि कधीच न संपणारा रोमांस  दाखवला आहे. या सीरिजच्या पहिल्या सीजनमध्ये विक्रांत मैसी आणि हरलीन सेठी हे मुख्य भुमिकेत पहायला मिळाले होते. या सीरिजच्या तिसऱ्या भागामध्ये सिद्धार्थ शुक्ला आणि सोनिया राठी हे मुख्य भुमिकेत पहायला मिळाले होते.

लाहौर कॉन्फिडेंशियल –
ओटीटी प्लॅटफॉर्म झी5 वर प्रदर्शित झालेली ‘लाहौर कॉन्फिडेंशियल'(Lahore Confidential) या सीरिजला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. या सीरिजचे दिग्दर्शन कुणाल कोहली(Kunal Kohli) याने केले असून ही स्रीरिज क्राइम, ड्रामा आणि थ्रिल आहे जे प्रेक्षकांना खूपच आवडले. यामध्ये रिचा चड्ढा(Richa Chadha), करिश्मा तन्ना(Karishma Tanna), अरुणोदय सिंह(Arunoday Singh), खालिद सिद्दीकी(Khalid Siddiqui), निखत खान(Nikhat Khan) सारखे कलाकार मुख्य भुमिकेत आहेत. हा चित्रपट यावरच प्रदर्शित झालेला लंडन कॉन्फिडेंशियल(London Confidentia) याच चित्रपटाचा सिक्वेल लाहौर कॉन्फिडेंशियल असे आहे. यामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील गुप्त हेर यावर आधारित आहे. यामध्ये रिचा चड्ढाला एक गुप्त मिशनवर पाठवले जाते आणि तिथे ती एका पाकिस्तानी हेराच्या प्रेमात पडते आणि त्यांचे प्रेमप्रकरण सुरु होते.

द फॅमिली मॅन –
द फॅमिली मॅन(The Family Man) हीे वेबसीरिज ऑमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाली होती. या सीरिजमध्ये एका अशा एजंटची स्टोरी दाखवली आहे च्याच्या कामाबद्दल त्याच्या घरच्यांना काहीच माहीत नसते. यामध्ये मुख्य भुमिकेत मनोज बाजपेई(Manoj Bajpayee) दाखवले असून यामध्ये खूप क्राईम आणि सस्पेंस दाखवला आहे. आतापर्येत या वेबसीरिजचे दोन सिजन आले आहेत. या सीरिजला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहेत, आणि प्रेक्षक याच्या चौथ्या सिजनची खूप आतूरतेने वाट पाहात आहेत.

हॅलो मिनी3 –
एम एक्स प्रस्तुत हॅलो मिनी3(Hello Mini3) ही एक रोमांटिक आणि थ्रिलर वेबसीरिज आहे जी एक तरुन मुलगी मिनीची स्टोरी आहे.या वेबसीरिजमध्ये चांगल्या स्टोरीसोबत तुम्हाला खूप बोल्ड कंटेंट देखिल पाहायला मिळतो. या सीरिजचे दिग्दर्शन फारुक कबीर(Faruk Kabir) यांनी केले असून ही वेबसीरिज नोवेल चक्रवर्ती आणि क्रोक्टेल्सवर लिहिलेल्या नोवेलवर आधारित आहे. यामध्ये एक तरुन मुलगी रिवाना जी कोलकत्तावरुन मुंबईला येते आणि अचानक कोणीतरी तिचा पाठलाग करत तिला ब्लैकमेल करत आहे.

द गर्ल ऑन द ट्रेन –
द गर्ल ऑन द ट्रेन(The Girl On The Train) ही वेबसीरिज नेटफ्लीक्सवर उपलब्ध असून एका हॉलिवूड चित्रपटाचे हिंदीमध्ये रुपांतर केले आहे. या सीरिजमध्ये एका घटस्फोटी महिलेची स्टोरी दाखवली आहे जी एका अशा कपल्सची कल्पना करत आहे ज्यांच्यामध्ये कोणत्याच प्रकारचे मतभेद नसतात. तिच्या घरासमोरुन रोज रेल्वे जाते आणि एक दिवस असे काही घडते जे सगळ्यांनाच थक्क करुन ठेवते. या सीरिजमध्ये खूप सस्पेंस आणि थ्रिलर सिन असून याच्या मुख्य भुमिकेत परिणिती चोपडा(Parineeti Chopra) आहे.

शुक्राणु –
नसबंदीसारख्या संवेदनशील मुद्द्यावर ‘शुक्राणू'(Shukranu) ही वेबसीरिज बनवली असून ही झी5 वर उलब्ध आहे. नसबंदीसारखा गंभीर मुद्दा असून सुद्धा ही वेबसीरिज पोटधरुन हसायला भाग पाडते. यामध्ये ‘मिरजापूर’ या सीरिजचा मुन्ना भैया असून शुक्राणू ही वेबसीरिज ट्विस्ट आणि सस्पेंसने भरलेली असून या तिघांची धमाल भुमिका आणि अभिनय सगळ्यांना हसण्यावला भाग पाडते. या सीरिजमध्ये दिव्येंदी शर्मा(Divendya Sharma), श्वेता बसू(Shweta Basu) आणि शितल ठाकूर(Shital Thakur) हे कलाकार मुख्य भुमिकेत आहेत आणि यांच्या कॉमोक टायमिंगच्या कॉमेडीने प्रेक्षकांचे मनं जिंकले आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेहा वाचा
अभिनेत्री ऐश्वर्या राय दुसऱ्यांदा होणार आई? व्हायरल व्हिडिओने रंगल्या चर्चा
अभिनेत्री दिव्या दत्ताला ‘अशा’ दिग्दर्शकांसोबत काम करणे नाही पसंत; म्हणाली, ‘मी नर्व्हस होते…’
Death Anniversary : कोरोना काळात गमावलेला जादूई आवाज,एसपी बालसुब्रमण्यम यांच्या नावावर होता ‘हा’ विश्वविक्रम

हे देखील वाचा