Thursday, March 30, 2023

फेक फोटोंमुळे चर्चेत आले होते ‘हे’ बॉलिवूड कलाकार, यादीमध्ये आहेत मोठ मोठे अभिनेते

आजकाल सोशल मीडियाचा जमाना चालू आहे त्यामुळे अनेक सेलिब्रिटी चर्चेत राहण्यासाठी आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. अशाचवेळेस काही लोक त्यांच्या फोटोंना एडिट करुन खोट्या बातम्या शेअर करत सोशल मीडियावर तुफान व्हायरल करतात. त्यामुळे अनेक सेलिब्रिटींना ट्रोलर्सच्या सोमोरे जावे लागते. असेच अनेक मोठ मोठ्या कलारांसोबत घडले आहे,त्यांच्याबद्दल खोट्या बातम्या शेअर करुन त्यांना जोरदार ट्रोल केले होते. चला तर जाणून घेऊया की यादीमध्ये कोणकोणते कलाकार आहेत.

सोनम कपूर
या यादीमध्ये सगळ्यात पहिले नाव आहे सोनम कपूर(Sonam Kapoor) सोनम सध्या नविनच आई झाली आहे त्यामुळे या दिवसामधी खूपच चर्चेत आली आहे. सोनम आणि तिचा पती आनंज आहुजा(Anand Ahuja) हे नवीनच आई-बाबा झाल्याचा आनंद लुटत आहेत. सोनम नेहमी आपला मुलगा वायुचे फोटो शेअर करत असते. मात्र, यापूर्वीही सोनम बाळामुळे चर्चेत आली होती. तिने वायुला जन्म दिल्या आगोदरच तिचा एका बाळासोबतचा फोटो सोशल माडियावर तुफान व्हायरल झाला होता. सगळ्यांना वाटले होते की, हा फोटो तिच्या मुलाचाच आहे. पण ही खोटी बातमी होती.

आमिर खान आणि फातिमा शेख
आमिर खान(Aamir Khan) हा अभिनेता जेवढा अभिनय क्षेत्रासाठी चर्चेत असतो तेवढाच त्याच्या वैयक्तीक आयुष्यासाठीही चर्चेत असतो. त्याने नुकत आपली दुसरी पत्नी किरण राव(Kiran Rao )हिच्यासोबत घटस्फोट घेतला आहे त्यामुळे तो चांगलाच चर्चेत आला होता. मात्र, याच दरम्यान त्याचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते की, त्याने तिसरे लग्न ‘दंगल’ मधली अभिनेत्री फातिमा शेख(Fatima Shaikh) सोबत विवाह केला आहे. पण हे फोटो खोटे होते, या फोटोमध्ये किरणच्या जागी फातिमा शोखचा चेहरा बसवला होता आणि हे खोटे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. त्यामुळे चाहत्यांनी आमिर खानला ट्रोलही केले होते.

शाहरुख खान
शाहरुख खान(Shahrukh Khan) देखिल अशाप्रकारच्या घटनांना सोमोरे गेला आहे. या अभिनेत्याचा काही वर्षापूर्वी सेशल मीडियावर एक फोटो तुफान व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तो डिजेलसाठी एका चाहत्याकडे पैसे मागताणा दिसत होता, पण हा फोटो खोटा होता. खरं तर हा फोटो एक सेल्फी होता जो 2016 मध्ये शाहरुख खानने सोशल मीडियावर शेअर केला होता. त्याचा आणखी एक फोटो व्हायरल झाला होता, या फोटोमध्ये त्याचे मोठे केस आणि दाढी पांढरी दाखवली होती. या फोटोमध्ये तो म्हातारा झाल्याचे दाखवले होते.

कॅटरिना कॅफ
कॅटरिना कॅफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल(Vicky Kaushal) ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडींपैकी एक आहे. यांचे लग्न फक्त चाहत्यांसाठीच नाही तर सेलीब्रीटींसाठीही गुपित केल्यासारखे होते. कारण यांच्या लग्नामध्ये फक्त मोजक्याच सेलब्रिटींना आमंत्रित केले होते. त्यामुळे प्रेक्षकापासून ते अनेक सेलिब्रिटींना त्यांचे लग्नाचे फोटो पाहण्यासाठी उत्सुकता होती. त्याच दरम्यान कॅटरिना कॅफचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता की, हा फोटो कॅटच्या मेहंदीमधला आहे, त्यामुळे तो फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. मात्र, हा फोटो खोटा ठरला होता. कॅटरिनाने एका जाहिरातीसाठी हे फोटोशूट केले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा
प्रदर्शनाआधीच ‘पोन्नियिन सेल्वन -1’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, थिएटर मालकांना मिळाली धमकी
हॉलिवूडवर शोककळा! अवघ्या तीस वर्षीय अभिनेत्याचे दुःखद निधन
अबब! विक्रम वेधासाठी ऋतिक रोशनने घेतले इतके कोटी, सैफ अली खानला टाकले मागे

हे देखील वाचा