‘बेबी मरवाके मानेगी’ गाण्यावर चक्क साडी नेसून थिरकली नोरा फतेही; प्रेक्षकही झाले हैराण


हिप हॉप, बेली डान्स नाहीतर बॉलिवूड डान्स असो कोणतीही डान्स स्टाईल करणारी अभिनेत्री आणि डान्सर म्हणजे नोरा फतेही. तिला डान्सचे एवढे वेड आहे की, डान्स करताना तिला कोणतीही समस्या येत नाही. मग ते साडीत हिप हॉप करणे का असेना, ते ती खूप चांगल्या पद्धतीने सगळं हाताळते आणि डान्स करते. हो! साडीमध्ये हिप हॉप. ही डान्स स्टाईल करताना भल्या‌- भल्यांना घाम फुटतो. परंतु नोरा साडी घालून देखील खूप चांगला डान्स करू शकते. तिचा हा डान्स पाहून सगळेजण फक्त तिच्याकडे पाहताच राहतात. असंच काहीसं ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या शोच्या मंचावर पाहायला मिळाले आहे. तिने जेव्हा साडी घालून हिप हॉप केला, तेव्हा प्रेक्षक हैराण झाले. (Actress And Dancer Nora Fatehi And Terence Lewis Did Hip Hop In Saree On Baby Marvake Manegi Song)

‘इंडियाज बेस्ट डान्सर’ च्या मंचावर एका स्पर्धकाने नोरा फतेहीच्या गाण्यावर जबरदस्त डान्स केला. त्यानंतर तिथे उपस्थित असलेले सगळेच खूप भावनिक झाले. यानंतर नोरा मंचावर येते आणि होस्ट भारती सोबत सगळ्या स्पर्धकांना मिठी मारते. त्यानंतर जेव्हा ती जजच्या सीटवर बसायला जाते, तेव्हा टेरेंस लुईस आणि नोरा फतेही ‘बेबी मरवाके मानेगी‌’ या गाण्यावर जबरदस्त डान्स करतात. खरंतर हा व्हिडिओ जुना आहे. पण लोकांना हा व्हिडिओ व्हिडिओ इतका आवडतो की, ते आजही बघण्यास पसंती देतात.

नोरा फतेही आणि टेरेंस लुईस यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडते. याच कारणामुळे त्यांचा जुना व्हिडिओ आज देखील पाहण्यास पसंती मिळत आहे. त्यांचा हा डान्स व्हिडिओ प्रेक्षकांना खूप आवडत आहे. ‘इंडियाज बेस्ट डान्सर’च्या मंचावर जेव्हा जेव्हा टेरेंस आणि नोराने डान्स केला आहे, तेव्हा तेव्हा शोचा टीआरपी वाढला आहे. नोराने खूप कमी कालावधीसाठी हा शो जज केला होता. या शोमध्ये ती मलायका अरोराच्या जागी काही महिने शो जज करताना दिसली होती. परंतु खूप कमी वेळात तिला लोकप्रियता मिळाली होती.

डान्सच्या बाबतीत नोराचा हात कोणीच धरू शकत नाही. तिच्या ‘दिलबर’ या गाण्याने तर सगळ्या गाण्यांचे रेकॉर्ड तोडून टाकले होते. नंतर ती ‘स्ट्रीट डान्सर 3’ मध्ये देखील दिसली होती. तिने ‘ओ साकी साकी’, ‘कमरिया’, ‘एक तो कम जिंदगानी’ या सुपरहिट गाण्यांवर डान्स केला आहे. ती लवकरच ‘सत्यमेव जयते 2’ या चित्रपटात दिसणार आहे. तसेच ती अजय देवगण आणि सोनाक्षी सिन्हा सोबत ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात देखील दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-फ्लॉप ऍक्टर ठरूनही रॉयल जीवन जगतोय अभिनेता आफताब; तर वयाच्या ३८व्या वर्षी दुसऱ्यांदा अडकला लग्नगाठीत

-केरळ हायकोर्टाकडून चित्रपट निर्माती आयशा सुल्तानाला अटकपूर्व जामीन मंजूर; भाजप नेत्याविरुद्ध केले होते वक्तव्य

-कपूर घराण्याचे नियम तोडत करिश्माने केले होते अभिनयात पदार्पण; वाचा अभिनेत्रीबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी


Leave A Reply

Your email address will not be published.