Tuesday, October 14, 2025
Home बॉलीवूड फीफा विश्वचषकात परफॉर्म केल्यानंतर नोराने गाठले ईडीचे ऑफिस, काय आहे कारण?

फीफा विश्वचषकात परफॉर्म केल्यानंतर नोराने गाठले ईडीचे ऑफिस, काय आहे कारण?

बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही सध्या भलतीच चर्चेत आहे. नुकत्याच फीफा विश्वचषक 2022मध्ये तिने लाईव्ह परफॉर्म केले होते. त्यामुळे तिने सर्वांचे लक्ष वेधले. अशात आता तिच्याबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. सुकेश चंद्रशेखर याच्याशी संबंधित 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात नोरा फतेहीची पुन्हा एकदा चौकशी करण्यात आली. शुक्रवारी (दि. 02 डिसेंबर) नोरा फतेही ईडी कार्यालयात दाखल झाली.

नोरा फतेही (Nora Fatehi) ही तपकिरी रंगाची मोठी बॅग घेऊन ईडी ऑफिसात पोहोचली. यावेळी तिने निळ्या रंगाच्या जीन्ससोबत तपकिरी रंगाचा टॉपही परिधान केला होता. तिच्या डोळ्यांवर यावेळी चष्माही लावण्यात आला होता. खरं तर, नोराशी या प्रकरणात यापूर्वीही चौकशी झाली आहे. विशेष म्हणजे, तिच्याव्यतिरिक्त अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) हिचीदेखील चौकशी करण्यात आली आहे.

नोंदवले जाणार नोराचे विधान
माध्यमांतील वृत्तांनुसार, सुत्रांनी असे सांगितले आहे की, सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) याच्याबद्दल नोराची चौकशी केली जाईल. तसेच, लाँड्रिंग प्रतिबंध कायद्याच्या कलमांतर्गत तिचे विधान नोंदवले जाईल. ईडीने या प्रकरणात आपल्या पहिल्या आरोपपत्रात अभिनेत्री जॅकलिनच्या नावाचा समावेश आरोपी म्हणून केला होता. त्याच फिर्यादीत नोरा फतेहीच्या जबाबाचा समावेश होता.

जॅकलिनला मिळालेला जामीन
ईडीने त्यांच्या आरोपपत्रात जॅकलिनलाही आरोपी बनवले होते. मागील महिन्यात जॅकलिनला 2 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि तेवढ्याच रकमेवर जामीन दिला गेला होता. मागील काही दिवसांपूर्वी पोलिसांनी पिंकी इराणीला अटक केली होती. त्याबद्दल म्हटले होते की, तिनेच जॅकलिनला सुकेशची भेट करून दिली होती. ईडीनुसार, जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांना सुकेश चंद्रशेखरने महागड्या गाड्या आणि इतर महागड्या वस्तू दिल्या होत्या.

सध्या सुकेश चंद्रशेखर हा तुरुंगात आहे. त्याच्यावर अनेकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. ईडीने 17 ऑगस्ट रोजी दाखल केलेल्या आरोपपत्रात चंद्रशेखरशी संबंधित कोट्यवधी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिनचा आरोपी म्हणून समावेश केला होता.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
फीफामध्ये लाईव्ह परफॉर्म करणाऱ्या नोरासोबत अश्लील कृत्य, घडला प्रकार व्हिडिओत कैद
आहा कडकच ना! रशियन महिलांवरही चढला ‘पुष्पा’चा फिव्हर, ‘सामी सामी’ गाण्यावरील डान्स व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा