Tuesday, April 16, 2024

फीफामध्ये लाईव्ह परफॉर्म करणाऱ्या नोरासोबत अश्लील कृत्य, घडला प्रकार व्हिडिओत कैद

अनेकदा कलाकारांसोबत एखाद्या गर्दीच्या ठिकाणी किंवा लाईव्ह शोदरम्यान छेडछाड केल्याच्या घटना समोर येत असतात. जेव्हा कलाकारांना हे समजते, तेव्हा ते तिथल्या तिथेच पाणउतारा केल्याशिवाय राहत नाहीत. मात्र, कधीकधी त्यांचे लक्ष जात नाही, पण चाहत्यांच्या नजरा सगळीकडे असतात. असेच काहीसे आता ‘दिलबर गर्ल’ नोरा फतेही हिच्यासोबत झाल्याचे पाहायला मिळाले आहे. नोरा फतेही फीफा विश्वचषक 2022 मध्ये परफॉर्म करताना दिसली. या संधीचे सोन करत नोरानेही स्टेजवर आपल्या डान्सने आग लावून टाकली. मात्र, यादरम्यान तिच्यासोबत वाईट कृत्य केल्याचे वृत्त समोर येत आहे. कथितरीत्या नोरासोबत बॅकग्राऊंड डान्सरने अश्लील कृत्य केले आहे, ज्यामुळे चाहत्यांचा पारा चढला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही (Nora Fatehi) हिच्या चाहत्यांनी हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत कतार येथे सुरू असलेल्या फीफा विश्वचषक 2022 (Fifa World Cup 2022)मधील लाईव्ह फॅन फेस्टिव्हलमध्ये नोरा परफॉर्म करताना दिसत आहे. तिच्या मागे अनेक बॅकग्राऊंड डान्सरही दिसत आहेत. हे सर्वजण स्टेजवर ‘साकी साकी’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

विचित्र पद्धतीने स्पर्श करताना दिसला व्यक्ती
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओच्या शेवटी नोरा जसा आपला डान्स पूर्ण करते, तसा एक व्यक्ती पाठीमागून येतो आणि तिला विचित्र पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. कदाचित तो नोराच्या टीमचा भाग असेल आणि तो माईक किंवा तिचा ड्रेस व्यवस्थित करत असावा. मात्र, चाहत्यांनी हा व्हिडिओ पाहताच आगपाखड करण्यास सुरुवात केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehism)

या व्हिडिओवर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी स्पष्टीकरण दिलंय, काहींनी नाराजी व्यक्त केली आहे, तर काहीजण प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, “तो काहीतरी ठीक करत असेल, किंवा काहीतरी बाजूला काढत असेल. तो कुठेही हात लावत नाहीये.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “लाज वाटू द्या जरा.”

याव्यतिरिक्त काहींनी नोराच्या डान्सचे कौतुकही केले आहे. नोराबद्दल बोलायचं झालं, तर तिचा सोशल मीडियावर मोठा वावर आहे. तिला इंस्टाग्रामवर 43.4 मिलियन म्हणजेच तब्बल 4 कोटींहून अधिक चाहते फॉलो करतात. त्यामुळेच कदाचित तिच्या फोटोंना लाखो लाईक्स मिळतात.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
शहनाझच्या हृदयात अजूनही जिवंत आहे सिद्धार्थ, आठवण काढत कॅमेऱ्यासमोरच रडली ढसाढसा
धक्कादायक! अयोध्याच्या हॉटेलमधून भोजपुरी अभिनेत्रीचे दागिणे- मोबाईल चोरी, पोलिसांकडून तपास सुरू

हे देखील वाचा