Wednesday, March 22, 2023

सुकेश चंद्रशेखर प्रकरणात बदनामी झाली, प्रतिमा सुधारण्यासाठी जॅकलीनने सुरु केली नवीन मोहिम

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) सध्या तिच्या अभिनयापेक्षा वादांमुळेच जास्त चर्चेत येताना दिसत आहे. जॅकलीन आणि सुकेश चंद्रशेखर प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे. या प्रकरणात जॅकलीनला अनेकवेळा इडीनेही समन्स बजावले होते. ज्यामुळे जॅकलीनची प्रतिमा माध्यमांमध्ये गढूळ झाली होती. आता हीच बदललेली प्रतिमा बदलण्यासाठी पुन्हा नव्याने स्वतःची इमेज बनवण्यासाठी जॅकलीनने नवीन मोहिम काढली आहे. काय आहे ही मोहिम चला जाणून घेऊ.

श्रीलंकन ​​अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने बॉलिवूडमध्ये चांगलेच नाव कमावले आहे. मात्र, आजकाल जॅकलिन फर्नांडिस तिच्या अभिनय किंवा चित्रपटांपेक्षा ठग सुकेश चंद्रशेखरच्या २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत आहे. या प्रकरणात जॅकलीन वाईटरित्या घेरली आहे. ईडीपासून दिल्ली पोलिसांपर्यंत तिची अनेकदा चौकशी झाली आहे. गेल्या सोमवारी त्यांना पटियाला हाऊस कोर्टात बोलावण्यात आले होते. मात्र, येथून त्यांना पुढील सुनावणीपर्यंत अंतरिम जामीन मिळाला आहे. दरम्यान, मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकलेल्या जॅकलिनने आपली प्रतिमा उजळण्यासाठी नवा मार्ग अवलंबला आहे.

सध्या जॅकलीन स्वच्छ भारत अभियानावर आधारित आगामी ‘बाल नरेन’ या चित्रपटाच्या कौतुकाचे पूल बांधत आहे. पवन नागपाल दिग्दर्शित आणि सोहम रॉकस्टार एंटरटेनमेंटचे दीपक मुकुट निर्मित, हा चित्रपट 14 ऑक्टोबर 2022 रोजी प्रदर्शित होत आहे. जॅकलीनने केवळ चित्रपटाचे कौतुक करायला सुरुवात केली नाही तर ती स्वच्छता मोहिमेचेही कौतुक करत आहे. ‘बाल नरेन’ सारखे चित्रपट लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’ला प्रोत्साहन देण्यासाठी प्रेरित करतील, असा विश्वास तिने व्यक्त केला. यासोबतच अशा मोहिमेला पूर्ण सहकार्य देण्याचेही तिने सांगितले आहे.

जॅकलीन या चित्रपटाचे कौतुक तर करत आहेच शिवाय स्वच्छता मोहिमेला पाठिंबा देण्याचा संदेशही देणार आहे. रिपोर्ट्सनुसार, जॅकलिन 1 ऑक्टोबर रोजी वर्सोवा बीचवर सकाळी 8 वाजता वर्सोवा स्वच्छता मोहिमेत सामील होईल. एकीकडे ‘बाल नरेन’ हा चित्रपट पंतप्रधान मोदींशी जोडला जात आहे, तर अलीकडेच दिग्दर्शक पवन नागपाल यांनी या चित्रपटाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा- ‘मला फसवण्यात आले आहे…’, राज कुंद्राने लिहले पंतप्रधानांना पत्र, सीबीआय चौकशीची केली मागणी
अभिनेता बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून शान आला होता इंडस्ट्रीत; वयाच्या १७ व्या वर्षी मिळाली गाण्याची संधी
भोजपुरीतील सर्वात रोमँटिक गाणं होतंय व्हायरल, यामिनी सिंगच्या अदांवर फिदा झाला अरविंद अकेला कल्लू

हे देखील वाचा