यामी गौतमनंतर आता ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने थाटला दिग्दर्शकासोबत संसार; लग्नाचे फोटो केले शेअर


बॉलिवूडमधून सध्या आनंदाच्या बातम्या येत आहेत. अनेक अभिनेत्री आपल्या संसार थाटताना दिसत आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच ४ जून रोजी अभिनेत्री यामी गौतमने ‘उरी’ चित्रपटाचा दिग्दर्शक आदित्य धरसोबत लगीनगाठ बांधली होती. अशातच आता आणखी एक अभिनेत्री लग्नबंधनात अडकली आहे. विशेष म्हणजे या अभिनेत्रीनेही दिग्दर्शकासोबतच लग्न केले आहे.

अभिनेत्री अंगिरा धरने दिग्दर्शक आनंद तिवारीसोबत गुपचूप लग्न केले आहे. या लग्नाचा खुलासा अंगिराने फोटो शेअर करून केला आहे. अंगिराने अधिकृत इंस्टाग्रामवर लग्न समारंभाचे फोटो शेअर केले आहेत. तसेच आनंदनेही एक फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. (Actress Angira Dhar Weds Anand Tiwari Secretly She Reveal With Sharing Photos)

पहिल्या फोटोत लग्नाच्या विधीदरम्यान अंगिरा आणि आनंद हवनशेजारी बसलेले दिसत आहेत. अंगिराने नवरीचा ड्रेस म्हणून लग्नासाठी पारंपारिक लाल रंगाच्या साडीची निवड केली आहे. दुसरीकडे आनंदनेही शेरवानी नेसली आहे.

या फोटोमध्ये दोगांच्याही चेहऱ्यावर गोड हसू दिसत आहे. त्यांच्यापुढे हवनमधील उंच अग्नीही दिसत आहे. अंगिराने हा फोटो शेअर करत लिहिले की, “अंगद आणि मी ३० एप्रिल, २०२१ रोजी आपल्या कुटुंबीय, जवळचे मित्र आणि पुरावा म्हणून देवाच्या उपस्थितीत आपल्या मैत्रीला प्रेमात बदलले आहे.”

आनंद केला अनलॉक
अंगिराने आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, “आमच्या जवळपासचे आयुष्य हळूहळू अनलॉक होत आहे. आम्हाला हा आनंद तुमच्यासोबत अनलॉक करायचा होता.” यासोबतच तिने लाल हार्ट इमोजीही आपल्या कॅप्शनमध्ये समाविष्ट केला आहे.

रीतिरिवाजानुसार झाले लग्न
अंगिराने लग्न रमारंभादरम्यानचा आणखी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत अंगिरा आणि आनंदसमोर एक महिला एक ताट घेऊन उभी आहे. ज्यामध्ये दिवे जळताना दिसत आहेत आणि काही गोड पदार्थही आहेत. यामध्ये अंगिराने घातलेली वजनदार ज्वेलरीही दिसत आहे. अंगिरा आणि आनंदच्या गळ्यात झेंडूच्या फुलांची माळ दिसत आहे. यासोबतच त्यांच्या मागे काही लोक उभे आहेत.

दिग्दर्शकासह अभिनेताही आहे आनंद
आनंद तिवारी दिग्दर्शकासोबतच एक अभिनेताही आहे. त्याने ‘लव्ह पर स्क्वेअर फूट’  या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. याव्यतिरिक्त त्याने ‘काइट्स’, ‘उडान’, ‘आयशा’ यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे.

अंगिराने केलंय या चित्रपटात काम
अंगिराने आतापर्यंत मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यात ‘कमांडो ३’, ‘लव्ह पर स्क्वेअर फूट’, ‘बँग बाजा बारात’ आणि ‘एक बुरा आदमी’ या चित्रपटांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आशुतोष पत्कीने शेअर केला जिममधला फोटो; पाहायला मिळाला बबड्याचा ‘फिट ऍंड फाईन’ लूक

-‘मैं तो खड़ी थी आस लगाए…’, रितिका श्रोत्रीच्या निरागसतेने नेटकऱ्यांना पाडली भुरळ

-कंगना रणौत करणार इंदिरा गांधींवर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन; म्हणाली, ‘माझ्यापेक्षा इतर कोणीही…’


Leave A Reply

Your email address will not be published.