Saturday, June 29, 2024

अंकिता लोखंडे अन् विकी जैनच्या लग्नाची पत्रिकाही त्यांच्यासारखीच आहे रॉयल, पाहा व्हिडिओ

अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) यांच्या लग्नाची त्यांच्या चाहत्यांना खूप उत्सुकता आहे. या जोडप्याच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अंकिताच्या चाहत्यांना तिच्या लग्नाशी संबंधित छोट्या-छोट्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. या जोडप्याने स्वत: त्यांच्या मित्रांना आणि नातेवाईकांना पत्रिकेचे वाटप केले आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता या जोडप्याच्या लग्नाच्या पत्रिकेचा व्हिडिओ समोर आला आहे, जी खूप रॉयल आहे.

पत्रिकेवर दिसत आहे लग्नाशी संबंधित तपशील
अंकिताने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून विवाहपूर्व सेलिब्रेशनचे अनेक फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये अभिनेत्रीचा आनंद स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. आता त्यांच्या लग्नाच्या पत्रिकेचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात येते की, या जोडप्याने पत्रिका तयार करण्यासाठी खूप खर्च केला होता. (actress ankita lokhande and vicky jain wedding card is also royal like them see viral video)

ही पत्रिका रॉयल ब्लू कलर बॉक्सच्या आकारात आहे. अंकिता आणि तिच्या बॉयफ्रेंडच्या नावासह लग्नाशी संबंधित सर्व तपशील पत्रिकेत दिसत आहेत. ग्रँड हयात येथे या जोडप्याचे लग्न होणार असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. मात्र, व्हिडिओवरून लग्नाची तारीख कळू शकलेली नाही.

अंकिताचे फोटो आणि व्हिडिओ होत आहेत व्हायरल

अंकिता लग्नाच्या जल्लोषात मग्न आहे. तिने मित्रांना बॅचलर पार्टी देखील दिली, ज्यांचे व्हिडिओ आणि फोटो इंस्टावर व्हायरल होत आहेत. अंकिताने पार्टीत खूप एन्जॉय केला. तिने गर्ल्स गँगसोबत डान्स केला आणि केक कापून आनंद साजरा केला.

 

विवाहपूर्व सोहळ्यात अंकिता आणि विकी पारंपरिक पोशाखात दिसले. फोटोमध्ये अंकिता हिरव्या आणि गुलाबी रंगाची साडी नेसलेली दिसत आहे. विकीने पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा घातला आहे. फोटोत हे जोडपे मुंडावळ्या बांधलेले दिसत आहे, जे लग्नाच्या दिवशी बांधण्याची प्रथा आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा