Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

एमएमएस व्हिडिओप्रकरणी अंकिताचे कळकळीचे आवाहन; म्हणाली, ‘आपल्या घरी आई-बहिणी आहेत, कृपया…’

सध्या देशभरात एका प्रकरणाची चांगलीच चर्चा होत आहे. ती म्हणजे, चंदीगड विद्यापीठ एमएमएस प्रकरणाची. या प्रकरणावर राजकीय व्यक्तींपासून ते बॉलिवूड कलाकारांपर्यंत अनेकांनी दु:ख व्यक्त केले आहे. यामध्ये टीव्ही आणि रुपेरी पडदा गाजवणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे हिचाही समावेश झाला आहे. अंकिताने चंदीगड विद्यापीठ एमएमएस प्रकरणी मौन सोडले आहे. तिने सोशल मीडियावरून चाहत्यांना कळकळीची विनंती केली आहे.

अंकिता लोखंडेने केली विनंती
चंदीगड विद्यापीठ एमएमएस (Chandigarh University MMS) या प्रकरणी अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये तिने सांगितले आहे की, “मित्रांनो, तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे की, ज्या कोणाला 50 मुलींच्या आंघोळीचा व्हिडिओ मिळाला आहे, तो कृपया काढून टाका. ही खूप मोठी विनंती आहे. आपल्या घरी बहीण आणि आईदेखील आहेत. कृपया ते डिलीट करा. त्यांचा आदर करा.” या प्रकरणावर बॉलिवूडपासून ते टीव्ही कलाकारांपर्यंत अनेकजण हा व्हिडिओ डिलीट करण्याची मागणी करत आहेत.

Ankita-Lokhande-Insta-Post
Photo Courtesy: Instagram/lokhandeankita

काय आहे प्रकरण?
चंदीगड विद्यापीठातून धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या कॉलेजमधील एका विद्यार्थीनीने 60 मुलींचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला आणि तो इंटरनेटवर शेअर केला होता. याप्रकरणाबद्दल देशभरात एकच खळबळ माजली आहे. अनेक विद्यार्थी विद्यापीठाच्या बाहेर प्रदर्शन करत आहेत. अभिनेता सोनू सूद यानेही ट्वीट करत लिहिले की, “चंदीगड विद्यापीठात जे काही घडले, ते खूपच दुर्दैवी आहे. ही वेळ आहे की, आपण आपल्या बहिणींसोबत उभे राहिले पाहिजे आणि एक जबाबदार समाजाचे उदाहरण ठेवले पाहिजे. आपल्या सर्वांसाठी ही परीक्षेची वेळ आहे, पीडित मुलींसाठी नाही. जबाबदार बना.”

आता अशातच अंकिता लोखंडेनेही मोठे वक्तव्य केले आहे. तिने केलेलं वक्तव्य सध्या जोरदार चर्चेत आहे. तिच्याबद्दल बोलायचं झालं, तर ती सध्या तिच्या पतीसोबत सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. यादरम्यानचे काही फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘काश्मिर फाईल्स’चा विक्रम मोडताच संतापले विवेक अग्निहोत्री; म्हणाले, ‘मी या फालतू स्पर्धेत…’
कार्तिक आर्यनला भेटण्यासाठी चिमुकल्या चाहत्याने केलं असं काही की….; व्हिडिओ पाहून व्हाल थक्क
‘स्पर्धाच घेऊ नका…’ पुरुषोत्तम करंडकाच्या निकालावर विजू माने यांची संतप्त प्रतिक्रिया, पोस्ट व्हायरल

हे देखील वाचा