‘कोणासारखी दिसते वामिका?’ चाहत्याच्या प्रश्नावर अनुष्काच्या नणंदने दिले ‘हे’ उत्तर


बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हे जोडपे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी ते एका गोंडस मुलीचे आई- बाबा झाले. त्यांनी त्यांच्या मुलीचे नाव वामिका असे ठेवले आहे. पण अजूनही त्यांनी त्यांच्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलेला नाही. त्यांचे चाहते वामिकाचा फोटो बघण्यासाठी आतुरतेने वाट बघत आहेत.

नुकतेच काही दिवसांपूर्वी विराट कोहलीची बहीण भावना कोहली ढिंगरा हिने इंस्टाग्रामवर ‘आस्क मी एनिथींग’ हे सेशन घेतले होते. यावेळी विराट आणि अनुष्काच्या चाहत्यांनी त्यांच्याबद्दल अनेक प्रश्न तिला विचारले. अनुष्का आणि विराटच्या एका चाहत्याने तिला प्रश्न विचारला की, “तू वामिकाला भेटली आहेस का? ती विराट सारखी दिसते की अनुष्का सारखी?” यावेळी भावनाने उत्तर दिले की, “हो मी वामिकाला भेटले आहे. ती एक परी आहे.”

दुसऱ्या एका युजरने विचारले की, “वामिकचा अर्थ काय आहे?” यावर भावनाने उत्तर दिले की, “दुर्गा मातेच्या एका अवताराला वामिका म्हणतात.” काही दिवसांपूर्वी विराटने त्याच्या एका लाईव्ह सेशनमध्ये सांगितले होते की, का त्याने त्याच्या मुलीला सोशल मीडियापासून दूर ठेवले आहे. विराटने सांगितले की, “आम्ही आमच्या मुलीला तोपर्यंत सोशल मीडिया पासून दूर ठेवणार आहोत, जोपर्यंत तिच्यात तेवढी समज येत नाही.”

अनुष्का आणि विराट यांनी 12 जानेवारीला वामिकाला जन्म दिला आहे. वामिकाच्या या नावावरून हे स्पष्ट आहे की, विराटच्या पहिल्या अक्षरावरून ‘व’ तर अनुष्काच्या शेवटच्या अक्षरावरून ‘क’ असे नाव ठेवलले आहे. अनुष्काच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती शेवटची शाहरुख खानसोबत ‘झिरो’ या चित्रपटात दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘पावसाळ्या संध्याकाळी होणारे काही मूड…’, म्हणत भजी खाण्यापूर्वी शेतात फिरताना दिसतोय सुव्रत जोशी

-जेव्हा कृष्णा अभिषेकने घेतले होते अनिल कपूरचे रूप; पाहून लोटपोट झाली होती सोनम कपूर

-‘तूच माझ्या जगण्याचा आधार’, सपना चौधरीच्या सुंदर व्हिडिओवर चाहत्याची प्रेमळ कमेंट


Leave A Reply

Your email address will not be published.