Monday, March 4, 2024

अर्रर्र! ‘या’ कारणांमुळे बाहुबली अभीनेत्री अनुष्का शेट्टीने कापले लांब केस

साऊथ अभिनेत्री अनुष्का शेट्टी तिच्या अभिनयासाठी आणि साैंदर्यासाठी ओळखली जाते. जेव्हा अनुष्काच्या चित्रपटांचा विचार केला जातो तेव्हा तिने निवडलेल्या भूमिका नेहमीच वेगळ्या असतात. अनुष्का तिच्या वेगवेगळ्या लूकसाठी आणि भूमिकेसाठीही ओळखली जाते. तिने गेल्या काही वर्षांमध्ये स्वत:मध्ये खूप काही बदल केले आहे जे प्रत्येकासाठी साेप्पे नसते. तिचं हे बदल पाहूण चाहतेही बऱ्याच वेळा आश्चर्यचकित हाेतात. यादरम्यान, अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर टँक टॉप आणि मॅचिंग लेगिंग्जमध्ये एक मोनोक्रोम फाेटाे पोस्ट केला. जाे साेशल मीडियावर प्रचंड व्हायरल हाेत आहे. म्हत्वाचं म्हणजे या फाेटाेमध्ये अभिनेत्रीने तिचे लांबलचक केस कापल्याचे बघायला मिळत आहेत.

अनुष्का शेट्टी (anushka shetty) हिच्या स्माईलमुळेही तिचा लूक खूप सुंदर दिसत आहे. अभिनेत्रीच्या या क्यूट लूकचे चाहतेही खूप कौतुक करत आहे. असं असलं तरी, अभिनेत्री तिच्या चाहत्यांना प्रभावित करण्यासाठी एकही संधी साेडत नाही. ती अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी संपूर्ण चित्रपट स्वत: सांभाळू शकते आणि तो हिट बनवू शकते. अभिनेत्रीने तिच्या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत लिहिले, “स्वप्न जादूने सत्यात उतरत नाही, त्यासाठी घाम, जिद्द आणि मेहनत घ्यावी लागते.”

अनुष्का शेट्टीच्यावर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती सध्या दिग्दर्शक महेश पी यांच्यासोबत एका प्रोजेक्टसाठी काम करत आहे. या चित्रपटात ती नवीन पॉलिशेट्टीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. यूवी क्रिएशन्स या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. माध्यमातील वृत्तानुसार, या चित्रपटातील भूमिकेसाठी तिने तिचे वजन वाढवले आहे. यापुर्वीही ‘साईज झिरो’ या चित्रपटासाठी अनुष्का शेट्टी हिने 20 किलो वजन वाढवले ​​होते. अशात ही अभिनेत्री यावेळी तिच्या चाहत्यांना किती प्रभावित करते हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिकेच्या हातावर रंगली मेहंदी, सोशल मीडियावर फोटो होतेय तुफान व्हायरल
इलॉन मस्क येताचं एम्बर हर्डने ट्विटरला केलं अलविदा; नेटकरी म्हणाले, ‘ब्लू टिकसाठी तिच्याकडे पैसे…’

हे देखील वाचा