ओठांच्या सर्जरीमुळे बदलला सलमान खानच्या अभिनेत्रीचा लूक; ‘चेहरा बर्बाद केलास’, म्हणत नेटकऱ्यांनी केले ट्रोल


बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी सुंदर दिसण्यासाठी आपल्या चेहऱ्याची सर्जरी केली आहे. अशामध्ये काहींच्या सर्जरी यशस्वी होतात, तर दुसरीकडे या सर्जरीमुळे अभिनेत्रींचा चेहरा खराब होतो. यामुळे त्यांना अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. यामध्ये अभिनेत्री आयेशा टाकियाचाही समावेश आहे. आयेशाने आपल्या ओठांची सर्जरी केली होती. ज्यानंतर तिने आपले नवीन फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. तो पाहून चाहते हैराण झाले आहेत. तसेच आता तिला नेटकरी जोरदार ट्रोल करत आहेत.

अभिनेत्रीचे हे फोटो तिच्या फॅन पेजवरूनही जोरदार व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर तिला फॉलो करणारी युवा पिढी सातत्याने तिच्यावर निशाणा साधत आहे. तिने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. यामध्ये ती आपल्या ओठांना फ्लॉन्ट करताना दिसत होती. तिच्या या फोटोंवर कमेंट करत नेटकऱ्यांनी सांगितले की, त्यांना तिचा हा नवीन लूक बिल्कुल आवडलेला नाही. (Actress Ayesha Takia Has Got A Lip Surgery That Went Horribly Wrong Fans Said You Have Done Wrong Things)

तिचे चाहते तिच्या फोटो आणि व्हिडिओचे कौतुक करत आहेत, तर दुसरीकडे काही युजर्स तिला ट्रोल करत आहेत. एका युजरने आयेशाच्या कमेंट करत लिहिले की, “तुझ्या चेहऱ्याला काय झाले आहे?” दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “स्वत:सोबत हे काय करून घेतलेस?” आणखी एका युजरने लिहिले की, “चेहरा बर्बाद केलास तू.” याव्यतिरिक्त दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “ए, हे काय करून घेतलेस?, यापूर्वी खूप चांगली दिसायची.”

आयेशा लग्नानंतर चित्रपटांपासून दूर झाली आहे. मात्र, ती सोशल मीडियामार्फत आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते. आता हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल की, नेटकऱ्यांच्या या टीकांवर प्रत्युत्तर देते की, नाही.

ट्रोलर्सबाबत म्हणाली होती…
आयेशाने मागील काही वर्षांपूर्वी ट्रोल होण्याबाबत म्हटले होते की, ती सातत्याने सोशल मीडियाची शिकार होत आहे. मात्र, यामुळे तिला काहीच फरक पडत नाही. मात्र, याप्रती ती लोकांना जागरूक करू इच्छिते. कारण प्रत्येक व्यक्ती एकसारखा नसतो. सर्वांमध्ये वेगळे काहीतरी असते.

आयेशाने केलंय या चित्रपटात काम
आयेशाने सलमान खानच्या ‘वाँटेड’ चित्रपटात काम केले होते. या चित्रपटातील तिच्या कामाला चाहत्यांकडून चांगली पसंती मिळाली होती. याव्यतिरिक्त अभिनेत्रीने ‘टार्झन: द वंडर कार’ चित्रपटातही दिसली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘केजीएफ चॅप्टर २’ ला मिळतोय भरभरून प्रतिसाद; तब्बल ‘इतके’ व्ह्यूज मिळवून यूट्यूबवर केलाय राडा!

-ब्लु नाईटीमध्ये दिसली रुचिरा जाधव; अभिनेत्रीच्या हॉट अंदाजाने नेटकरी झाले घायाळ

-उर्वशी रौतेलानंतर आता मुनमुन दत्तानेही केली ‘मड बाथ’; जॉर्डनमधील फोटो होतायेत व्हायरल


Leave A Reply

Your email address will not be published.