उर्वशी रौतेलानंतर आता मुनमुन दत्तानेही केली ‘मड बाथ’; जॉर्डनमधील फोटो होतायेत व्हायरल


सर्वात प्रसिद्ध टीव्ही कार्यक्रमांपैकी एक म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. या शोमधील सर्वच पात्रं चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. त्या कलाकारांपैकी एक म्हणजे मुनमुन दत्ता, जी शोमध्ये बबीता जीची भूमिका साकारत आहे. मुनमुन दत्ता सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे आणि तिच्या फोटोंद्वारे व व्हिडिओंद्वारे चाहत्यांचे मनोरंजन करतो. अभिनेत्रीने पुन्हा तिचे काही थ्रोबॅक फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती चिखलात अंघोळ करताना दिसली आहे. मुनमुन दत्ता ऊर्फ बबीता जीचे हे फोटो ४ वर्षांपुर्वीचे आहे, परंतु तिने पुन्हा ते शेअर केले आहे.

मुनमुन दत्ताने केली चिखलात अंघोळ

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या बबीता जीने म्हणजेच, मुनमुन दत्ताने हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती मृत समुद्रासमोर चिखलात भिजलेली दिसत आहे. मुनमुन दत्ताचा हा फोटो २०१७ सालचा आहे आणि त्यावेळी ती जॉर्डनला सुट्ट्या घालवण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिने चिखलात अंघोळ केली होती. मुनमुन दत्ता ज्या समुद्रासमोर उभी आहे, त्याला मृत समुद्र असे म्हणतात. (munmun dutta aka babita ji took mud bath in jordan see pics)

बबीता जी म्हणजे मुनमुन दत्ताने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “मृत समुद्र आणि चिखल स्नान. जॉर्डन २०१७.” ‘ मुनमुन दत्ताच्या या फोटोवर चाहते जोरदार प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. तसेच फोटोंवर ४ लाखाहून अधिक लाईक्स आले आहेत.

मुनमुन दत्ताची कारकिर्द

मुनमुन दत्ताने २००४ मध्ये ‘हम सब बाराती’ या मालिकेतून टेलीव्हिजनमध्ये पदार्पण केले होते आणि त्यानंतर २०० २००८ मध्ये ती ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोमध्ये बबीता जीच्या भूमिकेत दिसली. या भूमिकेमुळे तिला इतकी लोकप्रियता मिळाली आहे की, ती आता बबिता जी म्हणूनच ओळखली जाते. टेलिव्हिजन व्यतिरिक्त तिने चित्रपटांमध्येही आपला हात आजमावला आहे. मुनमुन दत्ताने ‘मुंबई एक्स्प्रेस’, ‘हॉलिडे’ आणि ‘ढिंच्याक एंटरप्राइज’ यांसारख्या चित्रपटात अभिनय कौशल्य दाखवले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘उडण्यासाठी पंखांची गरजच काय?’, म्हणत ऋतुजा बागवे कडून ग्लॅमरस फोटो शेअर

-‘केजीएफ चॅप्टर २’ ला मिळतोय भरभरून प्रतिसाद; तब्बल ‘इतके’ व्ह्यूज मिळवून यूट्यूबवर केलाय राडा!

-‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राने बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत वाजवलाय तिच्या अभिनयाचा डंका; वाचा तिचा जीवनप्रवास


Leave A Reply

Your email address will not be published.