बॉलिवूड अभिनेता सलमान खानसोबत ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये अभिनेत्री भाग्यश्रीने पदार्पण केले होते. याच अभिनेत्रीची मुलगी अवंतिका दासानी आता अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. अवंतिका ‘झी ५’ वेबसीरिज ‘मिथ्या’मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. या सीरिजमध्ये अवंतिका मुख्य भूमिकेत असलेल्या हुमा कुरेशीसोबत दिसणार आहे. या सीरिजचा फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे, ज्यावर हुमा आणि अवंतिका दिसत आहेत.
अभिनेत्री हुमा (Huma Qureshi) आणि अवंतिका दासानी (Avantika Dasani) लवकरच ‘मिथ्या’ या वेबसीरिजमध्ये दिसणार आहेत. चित्रपट निर्माते रोहन सिप्पी याचे दिग्दर्शन करणार आहेत. मिथ्या २०१९ च्या ब्रिटीश सीरिज चीटपासून प्रेरित आहे. हिंदी साहित्याच्या प्राध्यापिका जुही (हुमा कुरेशी) आणि तिची दार्जिलिंगमधील विद्यार्थिनी रिया (अवंतिका) यांच्यातील बिघडत चाललेले नाते यात दाखवण्यात आले आहे. क्लासमध्ये दोघींचे रूसणे-फुगणे सुरू असते आणि त्यानंतर दोघींमध्ये मानसिक वाद सुरू होतो. यादरम्यान अनेक धक्कादायक खुलासे होत असताना परिस्थिती आणखीनच बिघडते. अॅप्लॉज एंटरटेनमेंट निर्मित ही वेबसीरिज सहा भागात दाखवली जाणार आहे. या वेबसीरिजमध्ये परमब्रत चॅटर्जी, रजित कपूर आणि समीर सोनी देखील दिसणार आहेत.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर हुमा कुरेशीने २०१२ मध्ये ‘गँग्स ऑफ वासेपूर’मधून तिच्या करिअरची सुरुवात केली. या चित्रपटातील तिचा दमदार अभिनय सर्वांनाच आवडला होता. ‘नायक’, ‘देढ इश्किया’, ‘बदलापूर’, ‘हायवे’, ‘जॉली एलएलबी २’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तिच्या कामाचे कौतुक झाले. नुकतीच ती ‘महाराणी’ या वेबसिरीजमध्ये दिसली होती.
हेही पाहा- १७ किसही वाचवू शकले नाही हिमांशू मलिकचं करिअर
अवंतिकाबद्दल बोलायचे झाले, तर ती इंडस्ट्रीत नवीन नाही. अभिनेत्री भाग्यश्रीची ती मुलगी आहे. अवंतिका दासानी खूप मेहनती आहे. तिला लहानपणापासूनच अभिनय, डान्स आणि फॅशन डिझायनिंगमध्ये प्रचंड रस आहे. लंडनमधून मार्केटिंग आणि बिझनेसमध्ये पदवीधर झालेल्या अवंतिकाला आता चित्रपटांमध्ये नशीब आजमावायचे आहे.
हेही वाचा-
- ‘आरआरआर’मधील ‘नाटू नाटू’ गाण्यावर थिरकले राम चरण-कीर्ती सुरेश; व्हिडिओ पाहून तुम्हीही धराल ठेका
- ‘पंजाबच्या कॅटरिना’ला भावाकडून वाढदिवसाच्या झक्कास शुभेच्छा! व्हिडिओ शेअर करत म्हणाल, ‘तुला माझं आयुष्य…’
- Video: टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर हार्दिक पांड्यालाही चढला ‘पुष्पा’चा फिव्हर, आजीसोबत लावले ठुमके