×

‘पंजाबच्या कॅटरिना’ला भावाकडून वाढदिवसाच्या झक्कास शुभेच्छा! व्हिडिओ शेअर करत म्हणाल, ‘तुला माझं आयुष्य…’

आपल्या बोलक्या आणि खोडकर स्वभावाने सगळ्यांची मने जिंकणारी शहनाज गिल सिनेसृष्टीत सर्वांना माहित असलेले नाव आहे. मात्र, आपला मित्र सिद्धार्थ शुक्लाच्या अचानक जाण्याने शहनाजला मोठा धक्का बसला होता. ज्यामुळे ती खूपच खचली होती. शहनाजच्या चाहत्यांना मात्र तिची ही अवस्था बघवत नव्हती. त्यामुळे अनेकप्रकारे त्यांनी तिला खुश ठेवण्यासाठी प्रयत्न केले. गुरुवारी (२७ जानेवारी) शहनाजने आपला २९ वा वाढदिवस साजरा केला. यावेळी तिच्या भावाने तिचा एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. काय आहे या व्हिडिओत चला जाणून घेऊ.

बिग बॉस‘च्या १३ व्या पर्वात सगळ्यात चर्चेत राहिलेली आणि लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री म्हणजे शहनाज गिल (Shehnaaz Gill). आपल्या बोलक्या स्वभावाने आणि खोडकरपणाने शहनाजने या पर्वात धमाल केली होती. यामुळेच तिला कार्यक्रमात ‘पंजाबची कॅटरिना’ अशी ओळख मिळाली होती. या कार्यक्रमातील तिच्या आणि सिद्धार्थ शुक्लाच्या मैत्रीची तर जोरदार चर्चा पाहायला मिळाली. चाहत्यांनी या जोडीला ‘सिडनाज‘ असं नावही दिले होते. त्यांच्या मैत्रीची मोठी चर्चा आजही आपल्याला पाहायला मिळते. मात्र, सिद्धार्थच्या मृत्युने सगळ्यात मोठा धक्का त्याची मैत्रीण शहनाजला बसला होता. तेव्हापासून शहनाजने स्वताःला एकटे ठेवले होते. तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या चाहत्यांनी अनेक सुंदर भेटवस्तू दिल्या आहेत यामध्ये तिच्या भावाने शहबाजने शेअर केलेल्या एका व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये शहबाजने आपल्या बहिणीच्या बिग बॉसच्या (Bigg Boss) घरातील प्रवास दाखवला आहे. ज्यावेळी या कार्यक्रमात तो शहनाजला भेटायला गेला होता त्यावेळचे गाणे त्याने या व्हिडिओमध्ये दाखवले आहे. ‘मैं तेरा भाई तू मेरी बेहना’ असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्याच्या माध्यमातून त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या व्हिडिओसोबत त्याने “वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई, मी अभिमानाने सांगू शकतो की, तुझ्याशिवाय मी काहीचं नाही, लव्ह यू तुला माझंही आयुष्य लाभावं,” असा सुंदर संदेशही लिहिला आहे. यावेळी त्याने इमोजीही शेअर केल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by SHEHBAZ BADESHA (@badeshashehbaz)

दरम्यान लवकरच शहनाज ‘बिग बॉस १५’च्या अंतिम भागात सहभागी होणार आहे. ‘बिग बॉस १५’ च्या फायनलमध्ये ती आपला मित्र सिद्धार्थ शुक्लाला श्रद्धांजली देताना दिसणार आहे. या भागाचा प्रोमो समोर आला असुन हा भावूक क्षण पाहताना चाहत्यांनाही दुःख होत आहेत.

गायिका आणि अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असलेल्या शहनाजने ‘सरपंच’, ‘बर्बरी’, ‘वहम’सारख्या अनेक गाण्यांना आपला आवाज दिला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, शहनाजची एकूण संपत्ती २९ कोटी इतकी आहे. तिच्याकडे रेंज रोव्हर, जग्वार, होंडा सिटीसारख्या आलिशान गाड्या असून तिने मुंबई आणि चंदीगडमध्ये घर खरेदी केले आहे.

हेही वाचा-

Latest Post