Friday, May 24, 2024

कर्करोगाशी लढत असलेल्या अभिनेत्रीची इमोशनल पोस्ट चर्चेत; म्हणाली,’टक्कल पडलेल्या मॉडेलचे फोटोशूट…’

हल्ली कलाकारांमध्ये कॅन्सर झाल्याच्या प्रकार पुढे येत आहेत. यादरम्यान प्रसिद्ध मॉडेल रोजलिन खान(Rozleen Khan) ही सध्या रुग्णालयात असून कर्करोगसारख्या गंभीर आजाराशी झुंज देत आहे. तिने तिच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे माहिती दिली आहे. ती गेल्या सात महिन्यांपासून कर्करोगाची झुंज देत आहे. सध्या मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत आहे. या पोस्टमुळे ती चर्चेत आली आहे.

रोजलिनने तिचा फोटो शेअर करण्यासोबत एक लांबलचक पोस्टही लिहिली आहे. त्याने लिहिले, “कर्करोग…कठीण परिस्थितीत जगणाऱ्या लोकांचे जगणं काही सोपं नसते, असे कुठेतरी वाचलं होते. पण मला आता याची जाणीव होतेय की हे माझ्यासारख्या लोकांसाठी आहे. देव नेहमीच त्याच्या खंबीर सैनिकाला सर्वात कठीण लढाई देत असतो. हा माझ्या आयुष्यातील एक युद्ध असू शकतो. मला मिळालेला प्रत्येक धक्का हा मला अधिक खंबीर बनवतो. माझ्यासाठी अनेक लोक प्रार्थना करत आहेत. जे काही होते ते चांगल्यासाठी होते आणि ते माझ्यासाठी ते चांगले आहे. मला कर्करोगाची कोणतीही लक्षण जाणवत नव्हती. अनेकदा पाठीत दुखणं किंवा मानेकडील भाग दुखायचा. जिम्नॅस्टिकमुळे त्या वेदना होत असाव्यात असे मला सुरुवातीला वाटले. पण पाठदुखी वाढल्यानंतर मी तपासणी केल्यावर मला कर्करोग झाल्याचे कळलं.

 

View this post on Instagram

 

टक्कल असलेल्या मॉडेलसह काम करण्यासाठी धैर्य लागते
पण प्रिय ब्रँड्स, ही पोस्ट शेअर करत त्याने ब्रँड्सना सांगितले की, “मी तुमच्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शूट करण्यासाठी उपलब्ध असेन. कारण मला पुढील 7 महिन्यांसाठी केमोथेरपी घ्यावी लागणार आहे आणि प्रत्येक केमोथेरपीनंतर एक आठवडा विश्रांती घ्यावी लागेल. त्यामुळे आता तुम्हाला टक्कल असलेल्या मॉडेलबरोबर काम करण्यासाठी आणि तिला काम देण्यासाठी हिंमत दाखवावी लागेल. पण मी शेवटच्या क्षणांपर्यंत काम करेन”, अशी भावूक पोस्ट रोजलिन खानने केली आहे.

दरम्यान रोजलिन ही मुंबईत राहते. ती अभिनेत्री आणि मॉडेल आहे. काही वर्षांपूर्वी तिने PETA साठी फोटोशूट केले होते. ती स्तनाच्या कर्करोगाच्या जनजागृतीशी संबंधित कार्यक्रमांमध्ये सहभागी झाली होती. अनेक टीव्ही जाहिरातींमध्येही तिने काम केले आहे. तिने एका अडल्ट वेबसीरिजमध्येही काम केले होते. यात तिने सविता भाभी हे पात्र साकारलं होतं. यामुळे ती प्रसिद्धीझोतात आली होती.

रोजलिन खान शेवटची रजनीश दुग्गलसोबत समीर अंजानच्या ‘आ भी जा’ गाण्यात दिसली होती. माध्यमाच्या मुलाखतीदरम्यान रोजलिन म्हणाली, “सुरुवातीला, जेव्हा मी पेटा आणि आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) साठी शूटिंग केले तेव्हा मला फक्त आयटम नंबर मिळत असे किंवा ज्यामध्ये बरेच स्किन शो समाविष्ट होते. पण कोविडच्या काळात मी स्वत:ला ब्रेक दिला. एक काळ असा होता की मी काही न करता घरी बसले होतो कारण मला काहीतरी वेगळं करायचं होतं. मला वाटते की ही मुलगी फक्त बोल्ड शूट करण्यापेक्षा बरेच काही करू शकते हे बर्‍याच लोकांना समजले आहे. म्हणूनच मला हा म्युझिक व्हिडिओ मिळाला आहे. रोझलिनचे दोन आगामी प्रकल्प आहेत. यामध्ये लघुपट आणि म्युझिक व्हिडिओचा समावेश आहे.(viral peta photoshoot model rozleen khan diagnosed cancer shares picture from hospital)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अभिनयापेक्षा ‘या’ गोष्टीला दिले जाते महत्व, राधिका आपटेनी केला धक्कादायक खुलासा

अबब! ‘या’ एका सवयीमुळे चक्क सेटवर म्हशी बांधणारा अवलिया, ‘शोले’ च्या गब्बरचा असा आहे सिनेप्रवास

हे देखील वाचा