Saturday, November 23, 2024
Home बॉलीवूड सुकेशला करायचे होते चाहत खन्नाशी लग्न?, पाहा कसे आणि कुठे केले अभिनेत्रीला प्रपोज

सुकेशला करायचे होते चाहत खन्नाशी लग्न?, पाहा कसे आणि कुठे केले अभिनेत्रीला प्रपोज

सुकेश चंद्रशेखरच्या 200 कोटी फसवणूक प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. एकीकडे न्यायालयाने जॅकलीन फर्नांडिसला दिलासा देत तिला परदेशात जाण्याची परवानगी दिली आहे. तर दुसरीकडे सुकेश चंद्रशेखर यांने गेल्या काही दिवसात नाेराविराेधात नाेट लिहून विष उकलले आहे. नोरावर आरोप करण्यासोबतच सुकेशने निक्की तांबोळी आणि चाहत या दोघांचीही नावेही घेतली आहे. सुकेशच्या म्हणण्यानुसार, या दोन्ही अभिनेत्री केवळ व्यावसायिक कामासाठी त्याच्याशी जोडल्या गेल्या होत्या. मात्र, चाहत खन्नाने दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात नुकत्याच नोंदवलेल्या तिच्या जबाबात सुकेश आणि तिच्या नात्याचे पूर्णपणे उलट उत्तर दिले आहे. एका मुलाखतीत अभिनेत्रीने सुकेश चंद्रशेखर यांच्याविरोधात अनेक मोठे खुलासे केले आहेत, जे ऐकून सगळेच हैराण झाले आहेत.

अलीकडेच चाहत खन्ना (chahatt khanna) हिने एका मीडिया संस्थेला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत चाहत खन्नाने सुकेश सबंधी अनेक खुलासे केले आहेत. चाहत खन्ना म्हणाली, “वर्ष 2018मध्ये मला एका कार्यक्रमात जज म्हणून उपस्थित राहण्याचा फोन आला. मुंबई विमानतळावर, मी एंजल खान नावाच्या एका महिलेला भेटले, तिने सांगितले की, ‘ती माझ्यासोबत कार्यक्रमाला येईल.’ दिल्लीत उतरल्यावर शाळेत जाण्यासाठी गाडी आली. पण थोड्या वेळाने आम्ही अचानक थांबलो आणि शाळेच्या आत प्रवेश दिला जाणार नाही म्हणून आम्हाला गाडी बदलावी लागेल असे सांगितले. त्यानंतर आम्ही एका ग्रे रंगाच्या इनोव्हामध्ये बसलो आणि काही सेकंदांनंतर मला समजले की, आम्ही तिहार जेलच्या बाहेर आहोत. याबाबत मी त्यांना विचारले असता, तुरुंगातून शाळेत जावे लागते, असे त्यांनी सांगितले.”

चाहतच्या म्हणण्यानुसार, यानंतर एक व्यक्ती तिला शेखर रेड्डी म्हणत खोलीत भेटला होता. अभिनेत्रीने सांगितले, “त्याने फॅन्सी शर्ट घातला होता, भरपूर परफ्यूम मारला होता आणि सोन्याची चेन घातली होती. त्यांनी स्वत:ची ओळख एका लोकप्रिय दक्षिण टीव्ही वाहिनीचे मालक आणि जयललिता यांचा पुतण्या अशी करून दिली. तो म्हणाला की, ‘तो माझा टीव्ही शो ‘बडे अच्छे लगते हैं’ पाहतो आणि मला भेटू इच्छितो.’ मी त्याला म्हणाली, ‘मला इथे का बोलावलं? मी माझ्या सहा महिन्यांच्या बाळाला घरी सोडले आहे आणि एक कार्यक्रम आहे असे समजून येथे आले.’ तो गुडघ्यावर पडला आणि म्हणाला की, ‘त्याला माझ्याशी लग्न करायचे आहे.’ मी त्याच्यावर ओरडले आणि त्याला सांगितले की, ‘मी विवाहित असून मला दाेन मुलं आहेत,’ पण त्याने मला सांगितले की,’ माझा नवरा माझ्यासाठी योग्य माणूस नाही आणि तो माझ्या दाेन्ही मुलांचा बाप बनायला तयार आहे.’

यानंतर चाहत खन्ना म्हणाली, ‘आम्ही दोघांनी 20 ते 25 मिनिटे जेलमध्ये घालवले, त्यानंतर आम्ही थेट विमानतळावर गेलो आणि वाटेत एंजलने मला सुमारे दोन लाख रुपये दिले आणि सांगितले की, ‘सुकेशला मी आवडते.’ या घटनेनंतर सुकेशने मला दोन ते तीन वेळा फोन केला. आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून त्याचे कॉल येत होते. याद्वारे तो सांगायचा की, ‘तो कोणत्याही नंबरवरून कॉल करू शकतो.’ यासोबतच माझ्या पतीचाही यात सहभाग असल्याचा दावा त्याने केला. तो मला भिन्नभिन्न गोष्टी सांगायचा. कॉल सुमारे एक मिनिट चालायचा या दरम्यान ताे माझ्या मुलांबद्दल विचारायचा आणि मला काही हवे आहे का ते विचारायचा.’

चाहत खन्ना हिच्या विषयी बाेलायचे झाले, तर तिला ‘बडे अच्छे लागते है’ यातून खरी ओळख मिळाली.(actress chahatt khanna opens about sukesh chandrashekhar marriage proposal to her in tihar jail and other things)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘लोकांना शाहरुखचा…’, पठाण वादावर शरद पवारांची लेक सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

‘वाटतंय की हा देश आता वेड्यांच्या…’, पठाण चित्रपटाची वाढती गर्दी पाहून माजी न्यायधीश संतापले

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा