Monday, August 4, 2025
Home हॉलीवूड घृणास्पद! जेव्हा फॅननेच घेतला होता ‘या’ कलाकारांचा जीव, एकीची २३व्या वर्षीच केलेली हत्या

घृणास्पद! जेव्हा फॅननेच घेतला होता ‘या’ कलाकारांचा जीव, एकीची २३व्या वर्षीच केलेली हत्या

चाहते हे कोणत्याही कलाकारांसाठी खूप महत्त्वाचे असतात. कारण, जेवढा मोठा चाहतावर्ग, तेवढाच त्या कलाकाराचा दबदबा. जसे की, बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार होय. मात्र, काही वेळा चाहत्यांमुळे कलाकारांना अनेक अडचणींचा सामनाही करावा लागतो. कलाकारांची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांना तासंतास गर्दीत वाट पाहावी लागते. मात्र, काही चाहत्यांचा वेडेपणा त्यांना अनेकदा भोवला आहे. काही चाहते असे होते, ज्यांनी आपल्याच आवडत्या कलाकारांचा जीव घेतला. या लेखातून आपण त्याच कलाकारांबद्दल जाणून घेणार आहोत…

डिमबॅग डॅरेल
माध्यमांतील वृत्तानुसार, आंतरराष्ट्रीय गिटारिस्ट डिमबॅग डॅरेल (Dimebag Darrell) हिचा २००४ साली मोठा कॉन्सर्ट भरवण्यात आला होता. हा कॉन्सर्ट पाहण्यासाठी पोहोचलेल्या एका चाहत्यानेच तिची हत्या केली होती. त्या चाहत्याने इतर ३ लोकांचाही जीव घेतला होता. त्यावेळी परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यासाठी पोलिसांना चाहत्याला मारावे लागले होते.

ख्रिस्तिना ग्रिमी
द व्हॉईसची उपविजेती ख्रिस्तिना ग्रिमी (Christina Grimmie) हिचाही या यादीत समावेश आहे. हिच्यावरही कॉन्सर्टमध्ये एका माथेफिरू चाहत्याने गोळी झाडून तिची हत्या केली होती. तसेच, त्या माथेफिरी चाहत्याने स्वत:लाही गोळी मारून आत्महत्या केली होती. आश्चर्याची बाब अशी की, ४ वेळा ग्रॅमी आणि एक ऑस्कर पुरस्कार जिंकणारे अमेरिकन अभिनेते आणि संगीतकार जॉन लेनन यांचीही त्यांच्या चाहत्याने हत्या केली होती. जॉनवर त्यांच्या एका माथेफिरू चाहत्याने त्यांच्याच फ्लॅटबाहेर गोळी झाडून हत्या केली होती.

रेबेका स्वायफर
अमेरिकन अभिनेत्री रेबेका स्वायफर (Rebecca Schaeffer) हिचीदेखील फ्लॅटबाहेर एका चाहत्याने हत्या केली होती. रेबेका हिची भेट घेण्यासाठी पोहोचलेल्या एका चाहत्याचा संयम सुटला होता. त्यानंतर त्याने तिची गोळ्या घालून हत्या केली होती.

सेलेना
सेलेना (Selena) या हॉलिवूड अभिनेत्रीबद्दल बोलायचं झालं, तर तिला वयाच्या २३व्या वर्षीच जगाचा निरोप घ्यावा लागला होता. तिची हत्या करणारा व्यक्ती तिच्याच फॅनक्लबचा अध्यक्ष होता. दोघांमध्ये पैशांच्या व्यवहारावरून वाद झाला होता. त्यानंतर त्या व्यक्तीने सेलेनावर हल्ला केला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक वाचा-

प्रसिद्ध दिग्दर्शक हरपला! ब्लॉकबस्टर ‘बालिका वधू’ सिनेमाची निर्मिती करणारे मजूमदार काळाच्या पडद्याआड

प्लेबॅक सिंगर नाही, तर वेगळंच होतं जावेद अलीचं स्वप्न, खास व्यक्ती गमावल्याने बदलले नाव

Khuda Haafiz 2 | रिलीझसाठी सज्ज झालाय चित्रपट, पण रिलीझपूर्वीच निर्मात्यांना मागावी लागली माफी

हे देखील वाचा