अभिनेत्री दिपाली सय्यद (Deepali Sayyad) हिने अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपटांमध्ये काम करून नाव कमावलेले आहे. तिने अनेक नाटक, जाहिराती तसेच मालिकांमध्ये देखील काम केले आहे त्याचप्रमाणे दिपाली राजकारणात देखील सक्रिय आहेत. शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये पाऊल टाकून तिने तिच्या राजकारणातील कारकीर्दीला सुरुवात केली. अशातच आता नवीन वर्षाच्या निमित्ताने तिने एका नवीन व्यवसायात देखील पदार्पण केलेले आहे. ते म्हणजे तीचे नवीन हॉटेल सुरू केलेले आहे.
दिपाली सय्यद हिने भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डी मध्ये नवीन हॉटेल सुरू केलेले आहे. त्यांनी या हॉटेलचे नाव मिनी हॉटेल अँड रेस्टॉरंट असे ठेवलेले आहे. याबाबतचे काही फोटो सोशल मीडियावर देखील शेअर केलेले आहेत.
View this post on Instagram
दिपाली सय्यद हिने सोशल मीडिया वरून तिच्या या नव्या हॉटेलची झलक तिच्या चाहत्यांना दाखवलेली आहे. या हॉटेलच्या उद्घाटनाच्या वेळी शिर्डीत भाजपचे विनोद तावडे आणि आमदार देवयानी करंडे यांनी भेट घेतली. आणि तिला या नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. दिपाली सय्यद हिने या आधी जाऊ तिथे खाऊ, चष्मेबहादूर, लग्नाची वरात लंडनच्या दारात, मुंबईचा डबेवाला, करायला गेलो एक, लग्नाचा धुम धडाका यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करून प्रसिद्धी मिळवली आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
सई, प्रसाद, समीर आणि ईशाची पतंग उडाली! संक्रांतीनिमित्त ‘गुलकंद’च्या टीमकडून शुभेच्छा
‘माझ्यावर आभाळ कोसळलं होतं’; त्या घटनेने दुखावलेल्या किरण मानेची पोस्ट आली चर्चेत